मातंग समाजाने शिक्षणासह ,शाहू फुले आंबेडकर विचार अंगिकारावा -प्राचार्य डॅा निलेश गावंडे

 



नितीन फुलझाडे 

चिखली:- मातंग समाज अत्यंत प्रामाणिक समाज असुन या समाजाने ब्रास वाद्य कलेसह शिक्षणाची कास धरून शाहू फुले आंबेडकरी विचार अंगिकार केला पाहिजे असे मत  संत गाडगेबाबा बाबा विद्यापीठाचे व्यवस्थापकीय सिनेट सदस्य प्राचार्य डॅा निलेश गावंडे यांनी व्यक्त केले.ते चिखली शहरातील  राजा टॅावर येथे दिनांक २४ ॲागष्ट रोज रविवारला चिखली तालुका मातंग समाज संघटनेच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शत्तकोत्तर जयंती उत्सवा निमीत्त आयोजित जिल्हा मातंग समाज मेळावा व समाज जिवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय ब्रास बॅन्ड स्पर्धा कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणुन बोलत होते.या वेळी पुढे बोलतांना डॉ.गावंडे म्हणाले साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी होते त्यांनी आपल्या शाहिरी व्दारे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास साता समुद्राकडे पोहोचविला अशा या महान साहित्यिकाने  आपल्या साहित्यातून उपेक्षित वंचित समाजाच्या व्यथा व त्यांचे प्रश्न यासाठी संघर्ष करून लढणाऱ्या समाज नायकांना नायकत्व प्रदान केले.त्यांचे साहित्य म्हणजे एक चालते बोलते विद्यापीठ असुन मराठी अस्मितेचा झरा आहे..ते कलावंत व पत्रकार देखील होते.आज महाराष्ट्राला त्यांच्या विचारांची गरज असुन.मातंग समाजाने ब्रास वाद्य कलेसोबत शिक्षणाची कास धरून  शाहु फुले आंबेडकरी व विचाराचा अंगिकार केला पाहिजे.असे परखड मत व्यक्त केले.

तसेच या कार्यक्रमा निमित्त आयोजीत ब्रास बॅंड स्पर्धेतील प्रथम विजेता झालेल्या रमजान भारत ब्रास बॅन्ड राजस्थान या पथकाला त्यांच्या तर्फे डॅा इसरार यांच्या हस्ते एकावन्न हजारांचे बक्षीस वितरीत करण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्हा ,तालुका व शहरातील कला रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनिल कांबळे यांनी केले .तर  या कार्यक्रमाला शहरातील विवीध राजकिय पक्षाचे,नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


Previous Post Next Post