१४ ऑक्टोबर रोजी सातगाव नगरीत ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांचे दिव्य कीर्तन पर्व!
नितीन फुलझाडे
सातगाव: मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'भक्ती व प्रबोधन' सोहळ्याची मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५ पासून सुरुवात होत आहे.
या सोहळ्याचे पहिले पुष्प म्हणून वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध कीर्तनरत्न ह.भ.प. शिवलीला ताई पाटील यांच्या कीर्तनाचे सातगाव येथे सायंकाळी 7 वाजता विराट आयोजन करण्यात आले आहे.
शिवलीला ताई पाटील यांच्या अमृततुल्य वाणीतून संतांच्या विचारांचा मागोवा आणि भागवत धर्माचा सार श्रोत्यांना श्रवण करण्याची अमोल संधी मिळणार आहे.
आयोजक मनोज दांडगे (जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सातगाव व परिसरातील समस्त धर्मप्रेमी रसिकांना या धार्मिक आणि आध्यात्मिक मेजवानीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले जीवन कृतार्थ करण्याचे विनम्र निमंत्रण दिले आहे.
या कीर्तनाने १४ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत चालणाऱ्या मासरूळ सर्कलच्या भक्तीरसाच्या अखंडित प्रवाहाची भव्य सुरुवात होणार आहे.
संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा:
या सोहळ्यात यानंतर मासरूळ येथे गोविंद महाराज गायकवाड यांचे भारुड, गुम्मी आणि पाडळी येथे सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आणि धामणगाव येथे ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांचे कीर्तन, तसेच जामठी येथे भव्य खुली भजन स्पर्धा (१६, १७ व १८ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आली आहे.
मनोज दांडगे (अध्यक्ष, चिखली विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) तथा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मासरूळ जिल्हा परिषद सर्कल पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले आहेत.
