नितीन फुलझाडे
शेगाव:-जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी व परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने *"एक पेड माँ के नाम"* हा वृक्षारोपणाचा उपक्रम सुरू झालेला आहे.
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या 21 ऑक्टोबर 2025 रोजी वाढदिवस निमित्त हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात व इतर राज्यांमध्ये सुद्धा ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने झाडे लावण्यात येत आहेत, तसेच विविध उपपिठावरून वसुंधरा पायी दिंडी सुद्धा हा वृक्षारोपणाचा संदेश देत दक्षिण पीठ नाणिजधाम कडे निघालेल्या आहेत...
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या कृपा आशीर्वादाने रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी पश्चिम विदर्भ पीठ शेगाव येथे *1) शेगाव ग्रामीण ठाणेदार माननीय श्री. प्रवीण जी लिंगाडे साहेब,2) श्री एकनाथ तळेले साहेब कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग, खामगाव, 3) श्री गजानन बोबडे सरपंच चिंचोली , 4) श्री विजयभाऊ काटोले माजी सभापती प. स. शेगाव* यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. आज रोजी पश्चिम विदर्भ पिठावर *१५१ वृक्षारोपण* करण्यात आले,Globle Warming मुळे बहुतांश लोकांना फुप्पूसांचा त्रास सुरु झाला आहे हवेमध्ये ऑक्सिजन चे प्रमाण कमी झाल्यामुळे व कार्बन डायक्साइड चे प्रमाण वाढल्यामुळे
श्वसन घेण्यास सुद्धा त्रास होत आहे त्यामुळे रोगराईच्या प्रमाणामध्ये वाढ झाली असुन दवाखाने तुडुंब भरलेले आहेत. त्यामुळे 21 ऑक्टोबर जगद्गुरू श्रींच्या वाढदिवसा निमित्ताने प्रत्येक व्यक्तीने किमान 21 झाडे लावावीत. ज्यामुळे श्वसनाबाबतच्या समस्या दुर होतील त्यामुळे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजीनी *एक पेड माँ के नाम* हा उपक्रम हाती घेतला असुन त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळत आहे.
सदर सोहळ्याप्रसंगी रामानंद सांप्रदायाचे कार्यकर्ते पश्चिम विदर्भ पीठ व्यवस्थापक श्री.सुरेश मोरे साहेब, पीठ सह व्यवस्थापक श्री.ऋषिकेश बिरारी साहेब, पीठ महिला निरीक्षक सौ.लताताई चिंचोले, पीठ इंजिनिअर श्री.दिपक चिंचोले साहेब, पीठ अध्यात्मिक प्रमुख श्री.अमरभाऊ सांगळे, देणगी प्रमुख श्री.वैभव भिसे, पीठ प्रसिद्धी प्रमुख अमर इधोळ , उत्तर बुलढाणा जिल्हा सेवाध्यक्ष श्री.संतोष बोराडे सर, श्री.रावरकर सर , श्री. सुधाकर मेसरे काका, श्री. गणपत राठोड सर, श्री. नितीन भाऊ घोंगे, अभिषेक गवई, प्रज्वल ढगे, इत्यादी उपस्थित होते. सदर 151 झाडे लावण्याची सेवा श्री.दिपक चिंचोले साहेब व सौ. लताताई चिंचोले यांच्या माध्यमातून सेवा गुरुचरणी समर्पित केली.
