नितीन फुलझाडे
चिखली : इस्लाम धर्माचे प्रेषित मुहम्मद सल्लाल्लाहू अलैही वसल्लम यांच्या जयंतीनिमित्त चिखली शहरात मुस्लिम फाउंडेशन आणि हजरत टिपू सुलतान ग्रुपच्या वतीने महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम सलग पाचव्या वर्षी आयोजित करण्यात येत असून, यंदा 5 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामिण रुग्नालय चिखली येथे हा कार्यक्रम होणार आहे. इस्लाम धर्मानुसार 12 रब्बीउल अव्वल या पवित्र दिवशी प्रेषित मुहम्मद यांची जयंती साजरी केली जाते. या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात नागरिकांना उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे.
प्रेषित मुहम्मद यांनी जगाला शांती, प्रेम, आपुलकी, करुणा आणि दयेचा संदेश दिला. त्यांनी मानवतेला योग्य मार्ग दाखवत, प्रत्येक व्यक्तीच्या आचरणात मानवता आणि परस्पर सौहार्द असावे, असा उपदेश केला. त्यांच्या या शिकवणीला अनुसरून, मुस्लिम फाउंडेशन आणि हजरत टिपू सुलतान ग्रुप दरवर्षी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत आहे. रक्तदान हा मानवतेच्या कल्याणासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे, कारण रक्त कृत्रिमरित्या तयार करता येत नाही; ते केवळ मनापासून दान केले जाऊ शकते. रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचतात, आणि हीच भावना रक्तदात्यांना प्रेरित करते.
मुस्लिम फाउंडेशन आणि हजरत टिपू सुलतान ग्रुपने गेल्या पाच वर्षांपासून रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. या शिबिरात सहभागी होणारे रक्तदाते आपल्या रक्तदानाने अनेकांना जीवनदान देतात. रक्तदान हे केवळ सामाजिक जबाबदारीच नाही, तर मानवतेच्या सेवेसाठी एक पवित्र कार्य आहे. आयोजन समितीच्या वतीने आवाहन करण्यात येते की, यंदाच्या रक्तदान शिबिरात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे आणि रक्तदान करून प्रेषित मुहम्मद यांच्या मानवतेच्या संदेशाला प्रत्यक्षात आणावे.
रक्तदान शिबिर 5 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामिण रुग्नालय चिखली येथे आयोजित केले असुन या शिबिरात रक्तदान करण्यासाठी नागरीकांनी पुढे यावे, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.