चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक पिकविमा भरपाई...
बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमध्ये चिखली तालुका पीकविमा भरपाईबाबत अग्रेसर ठरला असून,चिखली तालुक्याला जवळजवळ 109 कोटी रुपये. पिकविमा भरपाई मंजूर झाली असून त्यापैकी 47 कोटी रुपये. चा पीकविमा वाटप झाला असून येत्या चार दिवसामध्ये उर्वरित रकमेचे वाटप करण्यात येणार आहे. सर्वाधिक पिकविमा भरपाई मिळविण्याचा मान यंदाहि चिखलीने पटकावला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा चिखली तालुक्याला मिळालेली पिक विमा नुकसान भरपाई कित्येक करोडो रुपयांनी अधिक असल्याने चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांचा सतत पाठपुरावा फलदृप झाला असा अंदाज लावता येतो.
आमदार श्वेता महाले पाटील यांचे परिश्रम फलद्रूप..
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व परिश्रमामुळे ही भरपाई वेळेत व मोठ्या प्रमाणात मिळवून देणे शक्य झाले. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत चिखली तालुक्याला सर्वाधिक लाभ मिळाला आहे. यामध्ये चिखली विधानसभा मतदारसंघातील बुलढाणा तालुक्यातील गावांतही समावेश केला तर इतर तालुक्याच्या मानाने चिखली तालुका खूप जास्त समोर असल्याचे दिसून येते.
शेतकरी संख्येतही चिखली अव्वल
लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येतही चिखली तालुका आघाडीवर आहे. त्यामुळे चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
शेतकऱ्यांचा कृतज्ञतेचा सूर
“आमदारांच्या प्रयत्नामुळे आमचे हक्काचे पैसे वेळेत मिळाले, आता पुढील हंगामाची तयारी आत्मविश्वासाने करता येईल,” अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून उमटत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा सर्वाधिक पिकविमा भरपाई मिळाली असून, या यशामागे आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे मोठे योगदान आहे.“पिक विमा हा शेतकऱ्यांचा हक्क असून तो वेळेत मिळवून देण्यासाठी आपण सदैव तत्पर व कार्यरत राहू,” असे आश्वासन आमदार श्वेताताई महाले यांनी दिले. जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमध्ये चिखली तालुका आघाडीवर राहिल्याने येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
