नितीन फुलझाडे
*चिखली/बुलडाणा*:- *चिखली तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात सुपरीचित असे राजकीय व्यक्तिमत्व सुनील सुरडकर यांची बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यकारणीवर सचिव म्हणून 24 ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष ॲड.नाजेर काझी यांनी एका पत्राद्वारे नियुक्ती केली आहे.*
*नुकत्याच पक्ष संघटन वाढवण्यासाठी व शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या लोकाभिमुख योजना पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्हा कार्यकारणीच्या सचिव या पदावर सुरडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, आपल्यावर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासंबंधीची जबाबदारी आली आहे. हे या ठिकाणी उल्लेखनीय, पक्ष संघटनेचे कार्य करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजित दादा पवार,राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल भाई पटेल, लोकप्रिय प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यास पक्ष संघटनेला अधिक बळकटी मिळण्यासाठी मोठी मदत होईल. त्या अनुषंगाने आपण प्रयत्नांची शिकस्त कराल, शुभेच्छांसह नियुक्तीपत्र बुलढाणा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी यांनी सुरडकर यांना दिले आहे. या नियुक्तीमुळे सर्व स्तरातून सुरडकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा मिळत आहेत.*
