बालाजी अर्बन ची 32 वी आमसभा संपन्न

 




बालाजी अर्बनची वाटचाल को-ऑपरेटिव्हंकडून कॉर्पोरेटकडे - ॲड. मंगेश व्यवहारे


नितीन फुलझाडे 

  चिखली:-  सभासदांच्या विश्वासाच्या बळावर बालाजी अर्बन पतसंस्था प्रगतीची शिखरे गाठत असून आधुनिकतेची कास धरत को ऑपरेव्टिव्हं क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी देखील कॉर्पारेट क्षेत्रासारखी सुविधा आपल्या ग्राहकांना दिली पाहिजे. संस्थेच्या वतीने सभासदांसाठी क्यु आर कोड , मोबाइ्ल बँकींग ॲप , सुरु करण्यात आली असून सभासदांनी या डिजीटल सेवांचा लाभ घ्यावा तसेच बालाजी अर्बनची वाटचाल को-ऑपरेव्टिव्हंकडून कॉर्पोरेटकडे होत असून ज्याप्रमाणे बालाजी अर्बन आय एस ओ मानांकन प्राप्तं करणारी विदर्भातील पहिली पतसंस्था ठरली आहे त्याचप्रमाणे कॉर्पोरेट क्षेत्राच्या तोडीची सेवा देणारीदेखील पहिलीच पतसंस्था ठरेल असा विश्वास बालाजी अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष ॲङ मंगेश व्यवहारे यांनी केला तसेच संस्थेने सुरक्षित कर्ज वाटपासाठी सुधन गोल्डं या पुणे येथील नामांकित कंपनीशी करार केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

रविवार दि 24 ऑगस्टं रोजी स्थानिक  मौनीबाबा संस्थानच्या भव्य प्रांगणात संपन्न्‍ झालेल्या 32 व्या आमसभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲडमंगेश व्यवहारे हे होतेतर मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष सत्यनारायण लढ्ढाकार्यकारी संचालक नारायणराव खरात, संचालक सुदर्शन भालेरावगोपाल शेटेनारायण  भवरप्रताप खरातआनंद जाधवजुलाल सिंग परिहारश्रीमती पुष्पाताई राजपूतसौसंध्याताई सावजीतज्ञ संचालक ॲड.  अर्पित मिनासेसि..मनीष गुरुदासानी यांची उपस्थिती होती.

आमसभेच्या सुरुवातीला  दीपप्रज्वलन करून भगवान बालाजीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलेयावेळी संस्थेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेल्या  चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिशजी गुप्तं , भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड विजय कोठारी , श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्षं पंडीत देशमुख, माजी जि.प. सदस्या डॉ. सौ. ज्योतीताई खेडेकर , चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील आदि मान्यवर उपस्थीत होते.

      याप्रसंगी बोलतांना संस्थेचे संचालक तथा पतसंस्था फेडरेशनचे तज्ञ संचालक सुदर्शन भालेराव यांनी सहकार खात्यामार्फत पतसंस्थांसाठी लागु करण्यात येत असलेल्या नवीन आदर्श उपविधीमधील जाचक ठरणाऱ्या नियमांबाबत माहिती दिली. त्यामध्ये सहकारी संस्थानी सहकार खात्याकडे जमा करणाऱ्या अंशदानाचा विषय, इतर गुंतवणुकीचा विषय या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

अहवाल वाचन संस्थेचे उपाध्यक्ष सत्यनारायण लढ्ढा,  संचालक तथा पतसंस्था फेडरेशचे तज्ञ संचालक सुदर्शन भालेराव , गोपाल शेटे,  नारायण भवर , प्रताप खरातआनंद जाधव, जुलालसिंग परिहार  तज्ञ संचालक सि..मनीष गुरुदासानीसरव्यवस्थापक अनिल गाडे, , सहाय्यक सरव्यवस्थापक  अशोक नाईकवरिष्ठ अधिकारी रमेश देशमुख , शाखाधिकारी अतुल शास्त्री यांनी केले.

 यावेळी  बँकींग संस्थेच्या सर्व शाखांमधुन सर्वोकृष्ठं सेवा देणाऱ्या दे. राजा शाखेचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे तांत्रीक सल्लागार शार्दुल व्यवहारे , धिरज लढ्ढा, स्वप्नील महाजन , सुदर्शन खरात यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

      आमसभेचे सुत्रसंचालन सरव्यवस्थापक अनिल गाडे यांनी तर आभारप्रदर्शन संस्थेचे संचालक प्रताप खरात यांनी केले. आमसभेच्या यशस्वीतेसाठी सरव्यवस्थापक अनिल गाडे यांच्या मार्गदर्शनामध्ये कर्मचारी वृदांनी परिश्रम घेतले. स्नेहभोजनाने सभेची सांगता झाली.

 

Previous Post Next Post