नितीन फुलझाडे
चिखली :- माळी समाज संघटन,चिखली शहर तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवार, दि. २४ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात व भव्य प्रमाणात पार पडला. या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून प्रकाश सपकाळ उपस्थित होते, प्रमुख मार्गदर्शक व सत्कारमूर्ती म्हणून गजानन घिरके साहेब (सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, वाशीम) तसेच गणेश पांडुरंग खरात यांनी हजेरी लावली.
समाजातील दहावी, बारावी व पदवी परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धा परीक्षांत यश संपादन केलेल्या कर्तृत्ववानांचा सत्कार या वेळी करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे दहावी व बारावी परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ. प्रमोद वानेरे व सौ. वैशालीताई वानेरे यांचेकडून प्रत्येकी ₹५००/- रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.यावेळी केशवराव सोनूने साहेब यांनी विशेष घोषणा केली की,“पुढील वर्षापासून दहावीमध्ये प्रथम येणाऱ्या सावित्रीच्या लेकींना प्रत्येकी ₹१०००/- चे रोख बक्षीस दिले जाईल.”
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री दिपक देशमाने (अध्यक्ष, मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था), श्रीरामभाऊ झोरे, प्राचार्य शैलेश भराड, केशवराव सोनूने साहेब, अशोकराव इंगळे, राजेश अवचार, शिवसेना शहर अध्यक्ष विलास घोलप,हरिबापू राऊत, डॉ. प्रमोद वानेरे,अनंता खरात,विजय जागृत आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी गजानन घिरके व गणेश खरात यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुचित भराड यांनी केले.आभार प्रदर्शन सुरेश देशमाने सर यांनी केले,तर बहारदार सूत्रसंचालन रामेश्वर मेहेत्रे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव भरत रामभाऊ खरात सर,ज्ञानेश्वर हरिभाऊ मेहेत्रे,नारायणराव राऊत,विजय खरात,रामेश्वर राऊत,भारत जैवाळ यांनी परिश्रम घेतले.समाजबंधू व भगिनींच्या उपस्थितीमुळे व मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरला.
