सोमठाणा येथील नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी...
नितीन फुलझाडे
चिखली : तालुक्यात झालेल्या अतिवृृष्टीमुळे बहुतांश शेतकर्यांच्या जमिनी खरबडून गेल्यामुळे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अगोदरच अडचणीत असलेला या सुल्तानी संकटामुळे बळीराजा संकटात सापडा असून या पूरबाधीत शेतकर्यांना योग्य मोबदला मिळावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खा. राजु शेट्टी यांनी येथील विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
तालुक्यातील सोमठाणा येथील शेतकर्यांच्या शेतजमिनी अतिवृष्टीमुळे खरबडून गेल्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्यांच्या शेतात पाणी साचून राहल्यामुळे उभी पिके वाया गेल्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले असून आज ता. 26 रोजी खा. राजु शेट्टी यांनी त्यांच्या सहकार्यासमवेत सोमठाणा येथे जावून शेतीची पाहणी केली. त्यानंतर विश्रामगृहावर झालेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी सरकारला या परिसरात झालेल्या शेतकर्यांच्या जमिनीची धूप झाल्यामुळे उभी पिके उध्वस्त झाली तर आहेच मात्र पुढील 3-4 वर्षेदेखील ही शेती नापीक राहत असल्यामुळे त्याचीदेखील सरकारने नुकसानभरपाई असे प्रतिपादन केले. सरकारने शेतकर्यांना देत असलेल्या मदतीच्या निकषामध्ये बदल करणे गरजेचे असून समृद्धी महामार्गाने देखील शेतकर्यांच्या शेतात पाणी थांबल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
या पत्रकारपरिषदेदरम्यान जिल्हाउपाध्यक्ष अनिल वाकोडे, युवा प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले, अमोल पाटील जिल्हाध्यक्ष, सचिन नारखेडे, मयूर बोर्डे, माधव पांढरे, प्रमोद सुरडकर, दादाराव सुरडकर यांच्या बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
