बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचा आकर्षण देखावा.....
नितीन फुलझाडे
बुलडाणा -
दरवर्षीप्रमाणे यंदाही बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचा वतीने बुलडाणा अर्बन संस्थेच्या मुख्यालयात श्रींची स्थापना संस्थेचे नुतन अध्यक्ष डॉ सुकेश झंवर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे हे यंदाचे हे 24 वे वर्षे आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा सौ कोमलताई सुकेश झंवर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना श्रीं स्थापनेच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी आरतीला अनंतभाऊ देशपांडे संस्थेचे सरव्यवस्थापक कैलास कासट , बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेश मंडळाचे कार्यकारिणी आणि मुख्यालयातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उज्जैन येथील महाकाल मंदीराचा देखावा.....
बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेश मंडळाचा सुंदर असा देखावा साजरा केला जातो, यावर्षी देखील उज्जैन येथील महाकाल मंदिराचा भव्य देखावा उभारण्यात आला आहे, तर सोबतच आकर्षण अशी गणेश मूर्ती आहे . देखाव्याची अतिशय सूक्ष्म आणि आकर्षण अशी मांडणी करण्यात आली आहे. बाजारपेठेत खरेदी करता येणारे नागरिक मोठ्या उत्सुकतेने या आकर्षक देखाव्याची पाहणी करीत असतात.
