*सात दिवसात कीट देणार असल्याचे कामगारमंत्री फुंडकर यांनी केले आश्वस्त*
नितीन फुलझाडे
चिखली : शासनाच्या वतीने नोंदणीकृत कामगारांना कीट दिल्या जाते. यासाठी दिलेल्या तारखेला कामगारांना हजर राहून पेटी व इतर साहित्य मिळते. कामगार हजर न राहिल्यास त्यांचा अर्ज बाद केल्या जातो. चिखली तालुका व शहरातील जवळपास ३०० कामगार दिलेल्या तारखेला उपस्थित असतांनाही सर्व्हर डाऊन व इतर तांत्रिक अडचणीमुळे त्यांना कामगार कीटपासून वंचित राहण्याची पाळी आली होती. याप्रश्नी कामगारांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता राहुलभाऊ बोंद्रे तात्काळ त्या ठिकाणी हजर झाले. त्यानंतर कामगारांच्या हक्काच्या कीटसाठी राहुलभाऊ बोंद्रे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी तात्काळ संबधित विभागाचे मुख्य सचिव तसेच कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्याशी संपर्क साधला. भ्रमणध्वनीवर कामगारमंत्र्यांनी तांत्रिक अडचणी दूर करुन सात दिवसात कीट देणार असल्याचे आश्वस्त केले अन् कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य फुल्याचे पाहायला मिळाले.
गोरगरीब व वंचितांच्या हक्कासाठी सातत्याने लढा देत असलेल्या माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांचे सोमवार २५ ऑगस्ट रोजीचे कामगारांच्या हक्कासाठी कीटसाठी केलेले आंदोलन चांगलेच लक्षवेधी ठरले. चिखली व तालुका व शहरातील ३०० कामगार आपले नियोजित काम सोडून पेटी व इतर साहित्य घेण्यासाठी चिखलीला आले होते. मात्र संबधित ठेकेदार तांत्रिक अडचणीमुळे कीटचे वितरण करु शकत नव्हता. तसेच कामगारांना सोमवारीच कीट मिळाली नाहीतर त्यांचे अर्ज बाद होणार होते. आणि ठेकेदाराने कामगारांना कीट दिली नाहीतर त्यांच्यावरही कारवाई करण्याचे शासनाचे आदेश आहेत. यापरिस्थितीत राहुल भाऊ बोंद्रे यांनी संबधित विभागाचे मुख्य सचिव, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याशी संपर्क साधला त्यांनी दिलगिरी व्यक्त करत लवकरात लवकर तांत्रिक अडचणी दुर करुन सात दिवसाच्या आत संबधित कामगारांना कीट उपलब्ध करुन देणार असल्याचे आशस्वत केले, हे विशेष..!
याप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष राहुल सवडतकर, तालुकाध्यक्ष रामभाऊ जाधव,युवक शहराध्यक्ष रिकी काकडे, युवक तालुकाध्यक्ष अंबादास वाघमारे,सतीश शिंदे, खविस अध्यक्ष ईश्वरराव इंगळे व इतर साहकरी उपस्थित होते.यांच्यासह कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*अन् कामगारांनी मानले राहुलभाऊंचे आभार*
तालुक्यातील अनेक कामगार आपला कामधंदा सोडून कीट घेण्यासाठी चिखलीला आले होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे कामगार कीटपासून वंचित राहण्याची पाळी कामगारांवर येणार होती. कामगारांच्या हक्काच्या कीटसाठी राहुलभाऊने घेतलेल्या आक्रमक पवित्र्याने कामगारमंत्री यांनी आकाश फुंडकर यांनी सात दिवसाच्या आत नोंदणीकृत कामगारांना पुन्हा बोलावून कीट वितरित करणार असल्याचे भ्रमणध्वनीवर सांगितल्याने त्यांनी राहुलभाऊंच्या आंदोलनामुळेच हे शक्य झाल्याच्या भावना व्यक्त करत माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांचे आभार मानले..
