अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हाध्यक्षपदी विजय राजाभाऊ खरात यांची नियुक्ती

 


नितीन फुलझाडे 

चिखली:- चिखली शहर तसेच संपूर्ण जिल्ह्यात परिचित असलेले बहुआयामी नेतृत्व व समाजाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी नेहमी तत्पर चिखलीचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात यांचे चिरंजीव विजय राजाभाऊ खरात शेतकरी तथा युवा उद्योजक यांची 15 जून रोजी अखिल भारतीय माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर यांनी एका पत्राद्वारे नियुक्ती केली आहे. 

     समाजात जागृतीचे काम, समाजाला योग्य दिशा देण्याचे काम आपण करत आहात आपल्या हातून महात्मा फुलेंच्या सत्यशोधक मार्गाचे मोठ्या प्रमाणावर कार्य व्हावे तसेच माळी समाजाचे संघटन गावागावात व जिल्ह्यात मजबूत व्हावे यासाठी विजय राजाभाऊ खरात यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना अखिल भारतीय माळी महासंघाच्या राज्य कार्यकारणी सदस्य तथा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष (घाटावरील विभाग) म्हणून नियुक्ती केल्याचे पत्रात म्हटले आहे.



         अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेश हिरळकार यांचे मार्गदर्शनात प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर यांनी ही नियुक्ती केली आहे.

      या नियुक्तीमुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे व भावी वाटचालीस माळी समाज बांधवांकडून खूप मोठ्या प्रमाणात सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Previous Post Next Post