दिंगबर जाधव यांची भाजपा किसान मोर्चा चिखली तालुका अध्यक्षपदी फेरनिवड

 


 

       चिखली:  विकासकन्या म्हणून  ओळखल्या जात असलेल्या कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले यांचे खंदे समर्थक हातणी येथील दिंगबर जाधव यांची भाजपा किसान मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.       

           हातणी येथील आमदार श्वेताताई महाले यांचे खंदे  समर्थक असलेले भाजपचे दिंगबर जाधव हे भाजपचे एकनिष्ठ व जुने कार्यकर्ते असुन या त्यांनी 1996 -- 97 मध्ये हातणी येथे भारतीय जनता पक्षाची शाखा स्थापन करुन  कामाला सुरुवात केली. त्यानंतर सर्कल प्रमुख म्हणून काम केले . त्यानंतर 5 वर्षे भाजपच्या किसान मोर्चाच्या  तालुका अध्यक्ष काम केले व त्या नंतर 5 वर्षे   जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले. त्याचप्रमाणे त्यांनी हातणी ग्रामपंचायत समितीचे उपसरपंच  5 वर्षे काम केले.सध्या ते गेल्या हातणी येथील ग्रामसेवा सोसायटी संचालक  म्हणून कार्यरत आहेत. मॉ जिजाऊ अर्बन पतसंस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते मॉ जिजाऊ मल्टी पर्पज  फाऊंडेशनचे अध्यक्ष  आहेत . दिंगबर जाधव गेल्या 5 वर्षांपासून भाजपच्या किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम करत होते.दिंगबर जाधव यांनी या 5 वर्षाच्या कार्यकाळात वेळोवेळी नेहमी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली  त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना पिकविमा लवकर मिळावा , अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई  मिळावी यासाठी, केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे त्यांच्या या उल्लेखनीय व चांगल्या कामगिरीमुळे व त्यांच्या कामाची पावती म्हणून भाजपाने पुन्हा एकदा विश्वास टाकून दिंगबर जाधव यांची भाजपा किसान मोर्चाच्या चिखली तालुका अध्यक्षपदी फेरनिवड केली आहे. त्यांना फेर नियुक्तीचे पत्र नुकतेच कोलारा येथील भाजपाच्या एका कार्यक्रमात चिखली कर्तव्यदक्ष आमदार सौ श्वेताताई महाले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे ,  भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ प्रतापसिंह राजपूत, वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रकाशबुवा जंवजाळ, भाजपचे तालुका अध्यक्ष डॉ कृष्णकुमार सपकाळ, भाजपाचे ज्येष्ठ नेते  साहेबराव पाटील , पंजाबराव धनवे, विरेंद्र वानखेडे आदी यावेळी उपस्थित होते. दिंगबर जाधव यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय   विकासकन्या असलेल्या कर्तव्यदक्ष आमदार सौ श्वेताताई महाले  यांना तसेच भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ प्रतापसिंह राजपूत , भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ कृष्णकुमार सपकाळ, किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश विदर्भ संयोजक चक्रधर लांडे यांना दिले आहे. त्यांच्या या फेर नियुक्तीमुळे त्यांच्या वर भाजपाच्या किसान मोर्चाच्या हजारो कार्यकर्त्यांकडून तसेच मित्रमंडळी व हितचिंतकाकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post Next Post