Khabarbat News- चिखली शहर मातंग समाज युवक कार्यकारिणी गठित; आण्णाभाऊ साठे जयंती भव्यदिव्य साजरी करण्याचा निर्धार

 



चिखली | प्रतिनिधी :-

        साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी चिखली तालुका मातंग समाज संघटनेच्या वतीने बुधवारी (दि. २९ जुलै) स्थानिक मरी माता मंदिर परिसर, जुना गाव येथे मातंग समाज बांधवांची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत चिखली शहर मातंग समाज युवक मंडळाची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते गठित करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजबांधव उत्तम भिकाजी कांबळे होते.

बैठकीचे प्रास्ताविक चिखली तालुका मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष अनिल कांबळे यांनी केले. यावेळी प्रभारी सचिव अंबादास कोंडू कांबळे, उपाध्यक्ष महादू साळवे, नामदेव कांबळे, प्रवीण कांबळे, पत्रकार छोटू कांबळे, सचिन कांबळे, सागर साळवे यांनी जयंती उत्सवाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करून आपली मते व्यक्त केली.

यावेळी चिखली शहर मातंग समाज युवक मंडळाच्या अध्यक्षपदी मोहन तायडे (जाफराबाद रोड), उपाध्यक्षपदी विशाल हरिभाऊ कांबळे (संभाजीनगर), सचिवपदी रमेश मधुकर घाडगे (रोहिदास नगर), सहसचिवपदी सत्यम संजय कांबळे (सुभाष नगर), कोषाध्यक्षपदी पिंटू अशोक गायकवाड (अण्णाभाऊ साठे नगर) यांची निवड करण्यात आली. तसेच धनंजय कैलास साळवे (जुना गाव), मुकेश दिनकर साळवे (जुना गाव), अनिल देवराव तायडे (रोहिदास नगर), सौरभ संतोष बावस्कर (सुभाष नगर), संदीप दिनकर निकाळजे (अण्णाभाऊ साठे नगर), पापाराम आसाराम साळवे (संभाजीनगर) आणि कृष्णा गंगाराम साळवे (गोरक्षणवाडी) यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

बैठकीत दरवर्षीप्रमाणे यंदाही १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती भव्यदिव्य स्वरूपात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंचायत समितीसमोरील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर सकाळी १०.३० वाजता शहरातील सर्व समाजबांधवांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. याच ठिकाणाहून जयंती मिरवणुकीचा प्रारंभ व समारोप करण्याचेही निश्चित करण्यात आले.

या बैठकीला योगेश साळवे, श्याम जाधव, दिनकर निकाळजे, संजय कांबळे, सागर कांबळे, अरुण घाडगे, संतोष बावस्कर, सुनील निकाळजे, गणेश नाडे, नितीन कांबळे, नामदेव यंगड, रतन साळवे, दीपक अंभोरे, तुकाराम निकाळजे, कृष्णा साळवे यांच्यासह संभाजीनगर, जुना गाव, रोहिदास नगर, गोरक्षणवाडी, सुभाष नगर, अण्णाभाऊ साठे नगर व जाफराबाद रोड परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी मातंग समाजातील युवकांनी विशेष पुढाकार घेतला.

Previous Post Next Post