चिखली मध्ये हिवताप जनजागरण व सर्वेक्षण मोहिमेस सुरुवात

 


नितीन फुलझाडे

 चिखली : जून ते ऑक्टोबर हा हिवताप व डेंगू आजारासाठी पारेषण काळ असतो त्यासाठी हिवताप व डेंगू या आजारापासून संरक्षणासाठी चिखली आरोग्य विभागाच्या वतीने हिवताप जनजागरण मोहीम व विशेष कंटेनर सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत शहरातील अति संवेदनशील भागात मे जून आणि जुलै या तीन महिन्यात विशेष कंटेनर सर्वेक्षण करून नागरिकांमध्ये आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात येत आहे.

 चिखली शहरातील हिवताप विभागातील आरोग्य निरीक्षक डोके व आरोग्य सेवक यांच्याद्वारे जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चौहान, सहाय्यक जिल्हा अधिकारी पांडे,होगे आणि वैद्यकीय अधीक्षक उमर सय्यद यांच्या मार्गदर्शनात विशेष कंटेनर सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली  यामध्ये शहरांमध्ये 1074 घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आणि त्या घरामधील 3686 पाण्याची भांडी तपासण्यात आली त्यापैकी 276 भांडयामध्ये  डासाच्या अळ्या आढळून आल्या त्यापैकी 214 भांड्यांमध्ये डासअळी नाशक द्रावण टेमिफोस टाकण्यात आले व उरलेली 62 भांडी कोरडी करण्यात आली.



 नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन....

 पावसाळ्यामध्ये अनेक भागात पावसाचे पाणीच असते त्यामुळे त्यामध्ये डासाची उत्पत्ती होऊन हिवताप व डेंगू सारखे आजार पसरण्याची शक्यता असते त्यामुळे नागरिकांनी आपल्या भागामध्ये पाणी साचू न देणे पाणी साचल्यास ते वाहते करावे किंवा  त्यामध्ये मुरूम टाकून बुजवण्यात यावे किंवा त्यामध्ये केरोसीन टाकावे किंवा जळालेले ऑइल टाकावे.आपल्या घरातील कुलर मधील पाणी नियमित बदलावे तसेच आपल्या फ्रीजच्या मागे असणारा डिफ्रॉस्ट ट्रे ही चेक करावा त्यामध्ये पाणी साचू देऊ नये तसेच आपल्या घरातील सर्व पाण्याची भांडी ही चांगल्या पद्धतीने झाकून ठेवावी त्यामध्ये डासाळे आढळल्यास ते स्वच्छ करून घासून पुसून कोरडी करून घ्यावीत.आपल्या घरातील संडासच्या वेस्ट पाईपला जाळ्या बसवण्यात याव्यात. घराबाहेर जात असताना अंगभर कपडे घालावे तसेच घरामध्ये डासांपासून संरक्षण होण्यासाठी मच्छरदाणीचा किंवा मॉस्किटो कॉइलचा वापर करावा. सासलेल्या  पाण्यामध्ये गप्पी मासे सोडल्यानंतर  मासे डासअळ्या खातात आणि डासाची पैदास कमी होते.नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन चिखली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उमर सय्यद यांनी केले आहे.

Previous Post Next Post