उबाठा, काँग्रेस व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश; चिखली मतदार संघात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट
चिखली :- मतदार संघातील विविध पक्षांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, युवक, महिला तसेच नागरिकांनी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. हा भव्य पक्षप्रवेश सोहळा शिवसेना पक्षाचे मुख्यनेते मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला...!
यावेळी उबाठा किसान सेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगरपालिका उपाध्यक्ष अशोकराव गव्हाणे यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच शिरपूर, केळवद, खंडाळा मकरध्वज, नायगाव बुद्रुक, करतवाडी, नायगाव खुर्द, माळवंडी, डोंगर खंडाळा आदी गावांतील शेकडो पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, युवक व महिला यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड म्हणाले की, "आज होत असलेला हा पक्षप्रवेश केवळ राजकीय कार्यक्रम नसून जनतेचा विकासाभिमुख नेतृत्वावर असलेला विश्वास आहे. शिवसेना ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी संघटना आहे. मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर विकासाची गंगा पोहोचत आहे. त्याच विकासाच्या प्रवाहात बुलढाणा जिल्हाही अग्रेसर राहावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.". पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, "गेल्या काही वर्षांत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, शिक्षण, आरोग्य तसेच विविध विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हाभर विविध पक्षांतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी स्वयंस्फूर्तीने शिवसेनेत प्रवेश करत आहेत. पक्षात आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान व जबाबदारी दिली जाईल. आगामी काळात शिवसेनेचे संघटन गावागावात अधिक मजबूत करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढा सुरूच राहील."
यावेळी शिवसेना बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख संजयजी सोनार साहेब यांनी पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत करून शिवसेना पक्षाची भूमिका व संघटनात्मक बांधणी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा बुलढाणा नगरपालिका गटनेते युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना मुख्य पक्ष निरीक्षक विजय अंभोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, माजी जिल्हाप्रमुख भास्करराव मोरे, किसानसेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, महिला आघाडी जिल्हा समन्वयक अनुजाताई सावळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी बापू देशमुख, संतोषराव वाकडे, गजानन ठेंग, विश्वासराव खंडागळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश गुजर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक तुपकर, शिवदूत तालुका प्रमुख नितीन राजपुत, कपिल खेडेकर, शिवसेना चिखली तालुकाप्रमुख गजानन मोरे, चिखली शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप, युवासेना शहर प्रमुख विठ्ठल जगदाळे, गणेशभाऊ यंगड, शिवसेना उपतालुका प्रमुख संदीप पालकर, निलेश अंजनकर, अनमोल ढोरे, शिवसेना दलित आघाडीचे दादाराव महाले, प्रभाकर मोहिते, शरद ताठे, उपसरपंच कुंदन यंगड, शिवाजी शिराळे, उपतालुका प्रमुख अनिल जगताप, बंडू आसाबे, जीवन उबरहंडे, विनोद वनारे, मुन्ना पाटील, ज्ञानेश्वर वाघ, गजानन रामराव गायकवाड, पिंटू गायकवाड, समाधान गायकवाड, उत्तम जाधव, प्रताप गायकवाड, संतोष गायकवाड, प्रमोद गायकवाड, मंगेश बिडवे, श्रीकृष्णा शिंदे, विलास भवर, मोहन सोळंके, दीपक रगड, विजय पवार, राहुल पवार, नितीन सुपे, बबलु मावतवाल, राम शेळके, गजानन जाधव, गोटू शर्मा, गजानन खडके, अक्षय करंडे, मनोज वाघमारे, गजानन भुसारी,यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवसेना बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख मा. संजयजी सोनार साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन तसेच शुभेच्छांचा वर्षाव करत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशस्वी राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यामुळे चिखली तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
