नितीन फुलझाडे
चिखली : भारतीय जनता पार्टी, चिखली शहर अध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी पदी म. नईम सौदागर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्ती पत्र जिल्हा अध्यक्ष विजयराजे शिंदे यांच्या उपस्थितीत आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
म. नईम सौदागर हे अनेक वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते शहरात पक्ष संघटन अधिक मजबुत करतील व पक्षाचा विस्तार करून त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी यशस्विरित्या पार पाडतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
