Khabarbat News- कोलारा मंडळ अंतर्गत गांगलगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर यशस्वीपणे संपन्न

 


नितीन फुलझाडे 

चिखली:- दिनांक 14 /5 /2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने कोलारा मंडळ अंतर्गत मौजे गांगलगाव ता.चिखली येथिल जि.प.मराठी प्रा.शाळेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून चिखली तालुक्याचे तहसीलदार श्री. विजयजी सवडे ; गटविकास अधिकारी  पोफळे साहेब, कृषी पर्यवेक्षक श्री.परिहार साहेब ,पुरवठा निरीक्षक  सोनकुसळे मॅडम व आरोग्य विभागाचे डॉ. वायाळ हे उपस्थित होते. सोबत गांगलगावचे  सरपंच शेषराव आराख ;माजी पंचायत समिती सदस्य मदन भाऊ म्हस्के, भाजपा नेते कृष्णकुमार सपकाळ, रोहडा गावचे सरपंच राजूभाऊ बुरकुल, माजी सरपंच नारायनआप्पा चित्राळे ,माजी सरपंच गांगलगाव नितीन  म्हस्के ; पोलीस पाटील रोहडा सुनील भाऊ बुरकुल व गांगलगाव पोलीस पाटील सौ. दिपाली सावळे ,सिद्धेश्वर संस्थान कोलारा चे अध्यक्ष श्री साहेबराव  सोळंकी , हे सुद्धा उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये प्रामुख्याने तहसीलदार सवडे साहेब यांनी नागरीकांना अकृषक तरतुदी,शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमित करणे,पांणदरस्ते,वर्ग 2 ची जमीन वर्ग एक करणेबाबत,तुकडेबंदी कायदयाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.महसूल विभागाच्या विविध योजनांची माहीती देत मंडळातील नांगरीकांच्या प्रश्नांचे निरसन केले. बि.डी.ओ पोफळे साहेब यांनी घरकुल योजनेबददल माहीती दिली. भागवत पाटील सहाय्यक कृषी अधिकारी यांनी कृषी विभागाच्या योजना संबंधी मार्गदर्शन केले.तसेच कृष्णकुमार सपकाळ यांनी शिबीरामध्ये परीसरातील माहीती दिली.  शिबीरात विविध योजनांअंर्तगत लांभाचे वितरण व विविध विभागाचें प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.शिबिर यशस्वीतेसाठी मंडळ अधिकारी कोलारा श्री.जी.बी.जाधव व ग्राममहसूल अधिकारी, श्री.प्रभाकर गवळी, श्री बद्रीनाथ वानखेडे , स्वाती व्यवहारे मॅडम, अर्चना शिंगणे मॅडम, श्री. सुभाष वाकोडे ,श्री नितीन काळे व श्री गजानन पडघान तसेच ग्रामपंचायत अधिकारी श्री सुधाकर इंगळे ,विजय इंगळे, गजानन बेलोडे,झोपे मॅडम, सहायक कृषी अधिकारी दंदाले साहेब, सोनुने मॅडम, वीज वितरण विभागाचे  श्री रणजीत बुरकुल साहेब, सर्व आरोग्य कर्मचारी,  अंगणवाडी सेविका व मदतनीस सी एस सी सेंटर चे राहुल टाकळकर, ,मंगेश चवरे तसेच महसूल सेवक अनुप म्हस्के ,आशा आव्हाड , सुनीता देवरे व रेखा गायकवाड, ग्रामपंचायत शिपाई मंगेश थुट्टे, सुनिल म्हस्के,विलास आराख,राजु म्हस्के व मनोहर जाधव यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रभाकर गवळी ग्राममहसूल अधिकारी व प्रास्ताविक तसेच आभार अनुप म्हस्के महसूल सेवक यांनी केले. नागरीकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी व एकाच दिवशी उपलब्ध करुन देणा-या या उपक्रमाला मंडळातील नागरीकांचा मोठा प्रतिसाद लाभला.तहसीलदार श्री. विजयजी सवडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या  संपन्न झाले

Previous Post Next Post