चिखली:- येथील आदर्श कॉन्व्हेंट चा विद्यार्थी सार्थक अमोल जोशी याने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत 87.20 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे कुटुंबासह मित्रपरिवार आणि परिसरातून त्याचे कौतुक करण्यात येत आहे.
सार्थकने नियमित अभ्यास, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले असून भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्याचा त्याचा मानस आहे. त्याच्या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आपल्या यशाचे श्रेय तो आई वडील,आजी-आजोबा व शिक्षकवृंदांना देतो.
Tags
खबरबात स्पेशल
