विश्वासार्हतेचे प्रतीक - अंबिका अर्बन; आमदार श्वेता महालेंकडून कौतुक
सामाजिक सेवेचा नवा संकल्प....
नितीन फुलझाडे
चिखली:- श्री अंबिका अर्बन पतसंस्थेची ३८ वी आमसभा दि.३० ऑगस्ट रोज रविवारला परमहंस रामकृष्ण मौनीबाबा संस्थान, चिखली येथे संपत्र झाली. आमसभा कामकाजाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन या आर्थिक वर्षात निधन झालेल्या सर्वांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.
यानंतर आमसभा कामकाज विषयाचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी पुर्व संस्थाध्यक्ष डॉ. सौ. संध्याताई कोठारी यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सहकार्य लाभलेल्या सर्व घटकांचे व मचांवर उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यांनतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सचिव श्री. विद्याधरजी महाले साहेब यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले की, पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे सहकार हा पतसंस्था चळवळीनी आपल्या भागात मोठ्या प्रमाणात रुजविला असुन सर्व संस्थाचे एकमेंकाना सहकार्य आहे व अंबिका अर्बनची नेत्रदिपक प्रगती ही दिपस्तंभाप्रमाणे असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी त्यांच्या वाढदिवसानिमीत्त त्यांचा संस्थेतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. यांनतर चिखली नगरीचे प्रथम नागरीक श्री. पंडीतराव देशमुख यांनी त्यांचे मत मांडतांना श्री अंबिका अर्बनची प्रगतीचा आलेख हा चढत्या स्वरुपाचा असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यांप्रसंगी संस्थेने त्यांचा जो यथोचित सत्कार केल्या त्याबद्दल त्यांनी अंबिका अर्बन परीवाराचे आभार मानले. याप्रसंगी चिखली तालुक्याच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी त्यांचे मनोगतामध्ये संस्थेच्या प्रगतीसाठी संस्थेचे अभिनंदन केले. व संस्थेचे कामकाज हे तारेवरची कसरत असुन अंबिका अर्बनचे हे कार्य सहजरित्या करीत असल्याचे मत व्यक्त केले. त्यानंतर अंबिका अर्बन परीवाराचे प्रमुख ॲड्.विजय कोठारी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संस्थेची प्रगती ही सर्व सभासद, ठेवीदार व हितचिंतकामुळे झालेली असुन संस्थेने जेव्हापासुन सुरक्षीत कर्जवाटपाचे धोरण अवलंबिले आहे त्यांनंतर एकुण कर्ज वाटपामध्ये ६२% वेअर हाऊस व सोनेतारण कर्जाचा टप्पा गाठला असल्याचे सांगितले. संस्थांनी सोनेतारण कर्ज व वेअर हाऊस कर्ज या सुरक्षीत कर्ज वाटपावर भर द्यावा असे प्रतिपादन केले. याप्रसंगी बोलतांना जास्त व्याजदर देणाऱ्या पतसंस्थेच्या मागे न लागता विश्वसनीय संस्थेत आपल्या बहुमुल्य ठेवी ठेवाव्यात. यासाठी आर्थिक साक्षर समाजनिर्मीती हे कार्य अंबिका अर्बन सातत्याने करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेचे सामाजिक उपक्रम म्हणुन संस्थेतर्फे ज्या गरजु रुग्णांना घरगुती वापरासाठी पलंग (बेड), वॉटर बेड, बेड पॅन, वॉकर, टॉयलेट चेअर, व्हिल चेअर, कमोड चेअर, ऑक्सीजन सिलेंडर या व यासारखे रुग्णांना आवश्यक असणाऱ्या साहीत्यांचे आजपासुन समाज सेवेमध्ये लोकार्पण करीत असल्याचे प्रतिपादन केले. तसेच येणाऱ्या काळात मा.आ.सौ. श्वेताताई महाले पाटील आणि गावकरी यांच्या संयुक्त मागणीनुसार अमडापुर परीसरातील जनतेसाठी स्वर्गरथ व शवपेटीची सेवा सुरु करण्यात येईल असे सांगितले.
याप्रसंगी कु. सिध्दी सोनुने, गिर्यारोहक व कु. अर्णवी लंबे, तलवारबाजी यामध्ये कामगिरी केल्याबद्दल यांचा यथोचित सत्कार करुन आर्थिक मदत म्हणुन रोख रक्कम रु. ५०००/- देण्यात आले. तसेच याप्रसंगी चिखली नगरपालीकेच्या उपाध्यक्षा सौ. वैशालीताई खेडेकर यांचा सुध्दा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
या वार्षिक सर्वसाधारण सभेला या प्रमुख उपस्थिती म्हणुन मंचावर चिखली विधानसभा मतदार संघाचा लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले, श्री. विद्याधरजी महाले साहेब, शि.प्र.म.चे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, विद्यानिकेतनचे अध्यक्ष सतीश गुप्त, चिखली, श्रीराम अर्बनचे अध्यक्ष तथा नप अध्यक्ष पंडीतराव देशमुख, संस्थेच्या पुर्व अध्यक्षा डॉ. संध्याताई कोठारी आणि विद्यमान अध्यक्ष ॲड्. विजय कोठारी,
उपाध्यक्ष भगवान नागवाणी तसेच संस्थेचे संचालक प्रेमराज भाला, श्रीराम कुटे, हनुमंत भवर, सुरेंद्र पांडे, लुनकरण डागा, अशोक कोटेचा, सौ. अर्चना पांडे, सौ. संध्याताई माहेश्वरी, गजानन पवार, आनंदराव हिवाळे, डॉ. गजानन गांधी, नविन मंत्री, डॉ. सौरभ कोठारी , अरविंद असोलकर, भिष्म गुरुदासाणी, प्रल्हाद पवार तसेच संस्थेचे सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या सभेचे सुत्रसंचलन श्री. सुरेंद्र पांडे आणि सौ. वैशाली बावस्कर आणि आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष श्री. भगवान नागवाणी यांनी केले आणि अहवाल वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन राऊत यांनी केले तसेच आमसभेच्या कामकाजात सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
