*महालक्ष्मी पतसंस्थेच्या प्रगतीत सभासदांचा मोठा वाटा - अध्यक्ष अशोकराव कुलकर्णी*
नितीन फुलझाडे
चिखली:- शहरातील अग्रगण्य महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेची १७ वी वार्षीक आमसभा रविवार दिनांक १३/०९/२०२६ रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री.अशोकराव प्रभाकरराव कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुनानक मंगल कार्यालय, सिंधी कॉलनी, चिखली येथे संपन्न झाली.
प्रथम महालक्ष्मीच्या फोटोचे पुजन करून मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. तसेच यावेळी उत्कृष्ट कर्जदार व ठेवीदार यांचा भेटवस्तू, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
संस्थेचे व्यवस्थापक श्री. रमेश राउत यांनी आमसभेमध्ये ३१/०३/२०२६ अखेरच्या अहवालाचे वाचन केले. यावेळी विषय पत्रिकेतील आर्थिक पत्रकावरील ठरावांना मंजुरात घेण्यात आली. संस्थेला ३१/०३/२०२६ रोजी रु. १७,५३,६३९/- इतका नफा मिळाल्याबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त करून नफा विनियोजनास मान्यता दिली.
सभेचे अध्यक्ष श्री. अशोकराव कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतामधून ठेवीदार व सभासद यांना मार्गदर्शन करतांना संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेऊन आर्थिक पत्रकावर विस्तृत विवेचन केले त्याचप्रमाणे संस्थेच्या सामाजिक उपक्रमाबाबत माहिती देत असतांना सर्व भाग धारकांना भागभांडवल वाढविण्याचे आव्हान केले. शेवटी संस्थेच्या प्रगती मध्ये सर्व सभासदांचा मोठा सहभाग व योगदान असल्याचे नमूद करीत सर्व उपस्थितांचे व सभासदांचे संस्थेच्या पुढील वाटचालीस यापुढे सुद्धा सहकार्य राहील असा विश्वास व्यक्त केला .
सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. श्री. अनिल गारोडे सर यांनी केले. अहवाल वाचन संस्थेचे व्यवस्थापक श्री. रमेश राउत तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक श्री. हाके सर यांनी केले. सभेस संस्थेचे जेष्ठ संचालक एम.बी.खरात सर, संचालक श्री. डिगंबरशेटे, श्री. रामभाऊ नवले, श्री. सुहास हांडे, श्री. सुरेंद्र जाधव, संस्थेच्या संचालिका सौ. संध्या तांगडे, सौ. वनिता गाडेकर, संस्थेचे तज्ञ संचालक श्री. भागवत देशमाने, श्री. अशोक रुद्राक्ष तसेचबहुसंख्य सभासद बंधु आणि महिला उपस्थित होन्या सभेच्या यशस्वितेसाठी संस्थेचे कर्मचारी, अल्पबचत प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.
