आदर्श विद्यालयातून प्रमोद विनोद खरे प्रथम
चिखली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडल, पुणे यांनी जाहीर केलेल्या फेब्रु/मार्च 2026 वर्ग बारावी निकालामध्ये आदर्श विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यात्तन, चिखलीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून कनिष्ठ महाविद्यालयाचा 100% टक्के निकाल लागला आहे.
या परीक्षेमध्ये विज्ञान विभागातून प्रमोद विनोद खरे याचा 543/600 (90.50 17) गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक आला असून हिमांशू सुधीर जगताप याचा द्वितीय तर कृष्णा रवींद्र गिर्हे याचा तृतीय क्रमांक आलेला आहे. तसेच कु. वैष्णवी विजय वाघ, कु. स्पृहा निलेश पापळकर, कु. अंजली संतोष खवसे यांना 90टक्के गुण मिळाले असून विज्ञान विभागाचे 81 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत आलेले आहेत.
कला विभागातून कु. साक्षी गजानन पवार (85.33%) गुण प्राप्त करून प्रथम तर कु. तेजस्विनी वसंत राठोड द्वितीय व कु. पूनम विष्णू गडकर तृतीय आली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयाचे 83 विद्यार्थी प्राविण्य श्रेणी असून 51 विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम कमविचा सुद्धा 100 टक्के निकाल लागला आहे.
यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराज भाला व सर्व संचालक, प्राचार्य सतीश गव्हले, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु व भगिनी यांनी अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
