Khabarbat News-चवदार तळे स्मृती समितीचे वतीने म. फुले जयंती निमित्त अभिवादन सभा संपन्न

 



नितीन फुलझाडे 

चिखली:- स्थानिक पंचायत समितीच्या राजश्री शाहु महाराज सभागृहात महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन चवदार तळे स्मृती समितीचे अध्यक्ष संजय वाकोडे यांच्यावतीने करण्यात आले होते.

               कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. बंडुभाऊ कुळकर्णी तसेच प्रमुख अतिथी महेश सेठ वाधवाणी यांनी म. फुलेंच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केली. प्रमुख वक्ते डॉ. प्रा. प्रफुल्ल गवई सर यांनी दीपप्रज्वलीत केला.

           कार्यक्रमाचे प्रस्ताविक चवदार तळे स्मृती समितीचे अध्यक्ष संजय वाकोडे यांनी केले.प्रा.डॉ. प्रफुल्ल गवई यांनी अत्यंत परखडपणे विचार मांडले व श्रोत्यांना अंतर्मुख केले.तसेच इब्राहिम बारुदवाला यांनीही विचार मांडले. बंडुभाऊ कुळकर्णी यांनी सांगीतले की, महात्मा फुलेंच्या विचारांचा अंगिकार केल्याशिवाय बहुजन समाजाचा विकास होणार नाही.

           कार्यक्रमाला महिलांची संख्या उल्लेखनिय होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्वप्नील हिवाळे यांनी केले.

         अभिवादन नंतर कवि संमलेन पार पडले.  महेश वाधवानी, मनोहर पवार, प्रशांत पाटील, निवृत्ती जाधव, संजय हिवाळे, सुभाष कुटे आदि कविंनी कविता सादर केल्या.कवि संमेलनाचे सुत्र संचालन अग्निशिल्प काव्य संग्रहाचे कवि संजय वाकोडे यांनी केले.

      कार्यक्रमासाठी रामदास वैष्णव, विनोद खंडाळकर, हुसेन कुरेशी, शिवाजीराव नरवाडे, बेबीताई हिवाळे, रफिक कुरेशी, भिमराव आराख, प्रकाश कांबळे, सोनुबाई नरवाडे, लताबाई भालेराव, संतोष भुसारी, अर्चनाताई बोर्डे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post Next Post