नितीन फुलझाडे
चिखली:- स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, समाज सुधारक आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त 10 मार्च मंगळवार रोजी सायंकाळी 7.30 वाजता राऊतवाडी स्टॉप, बांडे यांच्या घराजवळ अखिल भारतीय माळी महासंघ तालुका व चिखली शहर महिला आघाडीच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अभिवादन कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सौ. मीनल निलेश गावंडे यांची उपस्थिती लाभली तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये नगरसेविका सौ सुषमा विलास चव्हाण या होत्या. मान्यवरांनी आपले विचार मांडताना सांगितले की त्या कठीण काळात देखील शिक्षणाचे महत्त्व फुले दांपत्यांनी जपले व संघर्ष करीत स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली त्याबद्दल केले तेवढे कौतुक कमी ठरेल व आम्ही देखील आज त्यांच्यामुळेच यशाचं हे शिखर गाठू शकलो त्याचे पूर्ण श्रेय त्यांना जाते.यावेळी शिक्षिका सौ. छाया वानेरे, अखिल भारतीय माळी महासंघ महिला आघाडी तालुका अध्यक्षा सौ. गीता बांडे ,जिल्हा अध्यक्ष विजय राजाभाऊ खरात, अभय तायडे, राजेश मेहेत्रे, प्रा. दिपक नन्हई, बंडू खरात, गजानन मोळवणे, प्रशांत जैवाळ, दिपकराजे देशमाने, गजानन बांडे, प्रल्हाद बांडे, विष्णू बांडे, अभिषेक बांडे, विजयराव सोनुने यांच्यासह मोठ्या प्रमाणात माळी समाज बांधवांची उपस्थिती होती.सूत्र संचालन प्रांजल प्रल्हाद बांडे हीने केले.
विशेष:- यावेळी विशेष आकर्षण कु. अवनी अक्षय बांडे या चिमुकलीने केलेली सावित्रीबाईची वेशभूषा ठरली.

