*घरगुती गॅस सिलेंडर बुकिंग साठी काय आहेत पर्याय....*
*नितीन फुलझाडे*
*चिखली:- एकीकडे जग युद्धाच्या छत्रछायेत असताना घरगुती गॅस सिलेंडर मिळणार का नाही याबाबत वेगवेगळ्या गोष्टी ऐकावयास मिळत आहे. एकीकडे जो गॅस बुकिंग साठी नंबर देण्यात आलेला आहे तो लागत नसल्याने नागरिक अधिकच पॅनिक होत आहेत. घरगुती गॅस हा जीवनावश्य असून तो न मिळाल्यास स्वयंपाक घरातील सर्वच चित्र कोलमडत आहे. त्यामुळे महिला वर्गात तसेच नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त होत आहे.*
*याबाबत चिखली येथील रामदेव इन्डेन वितरणचे संचालक शैलेश भाऊ बाहेती यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की घरगुती गॅस सिलेंडरची कसलीही कमतरता नसून मुबलक प्रमाणात गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत.गॅस सिलेंडर मिळेल का नाही या भीतीच्या कारणांने जास्त प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर बुकिंग होत असल्याने, ऑनलाईन सर्वर व्यस्त दाखवत असून मिस कॉल लागण्यास अडचण येत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस ऑनलाईन नंबरला मिस कॉल पर्याय वापरणे सोयीस्कर ठरेल. ऑनलाइन तसेच बुकिंग केल्यानंतर दोन दिवसांमध्ये सिलेंडर घरपोच मिळेल.सुरळीत वितरण चालू आहे. त्यामुळे कोणीही गोंधळून न जाता नियमित व सुरळीत गॅस सिलेंडरचा पुरवठा होईल याबद्दल निश्चित राहावे असे आवाहन केले.*
*गॅस सिलेंडर बुकिंग करताना जो बुकिंग साठी नंबर दिलेला आहे त्यावर जर बुकिंग होत नसेल तर खालील पर्याय वापरावेत......*
1 *व्हाट्सअप क्रमांकाचा बुकिंग साठी वापर करावा*
2 *भीम ॲप, फोन पे, गुगल पे,ऑनलाइन गॅस बुकिंग पर्याय वापरून देखील बुकिंग करता येते*
