Khabarbat News- श्री संत सेनाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न

 



नितीन फुलझाडे 

चिखली:- नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेनाजी महाराज यांची जयंती चिखली येथील संभाजीनगर भागातील संत सेना महाराज भवन येथे 8 मार्च रोजी समाज बांधवांच्या मोठ्या संख्येत व उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत सेनाजी महाराज यांचा जयंती उत्सव साजरा साजरा करण्यात आला सर्वप्रथम महाराजांच्या मूर्तीला अभिषेक,पूजाअर्चा करून महाआरती करण्यात आली. तसेच समाज प्रबोधनकार संदीपपाल महाराज यांनी सामाजिक,चालू घडामोडी, व्यवसाय, अंधश्रद्धा निर्मूलन यावर प्रबोधनातून प्रकाश टाकला.



             यानंतर महाराजांच्या प्रतिमेसह मोटारसायकल रॅली संभाजीनगर भागासह संपूर्ण शहरात काढण्यात आली. यावेळी चौकाचौकात महाराजांच्या प्रतिमेचे समाज बांधवांनी स्वागत व पूजन केले. तसेच मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी समाजातील वरिष्ठ मंडळी, युवक, युवती यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविली. या जयंती कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खाजगी सचिव तसेच आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांचे पती विद्याधरजी महाले  साहेबांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी समाज बांधवांना जयंतीनिमित्त मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये नगरसेवक दीपक वाधवाणी, युवा नेते शिवराज पाटील व इतर मान्यवरासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.

Previous Post Next Post