Khabarbat News- *राष्ट्रीय कुरेशी कॉन्फरन्सच्या चौथ्या संमेलनाचे आयोजन*

 



  कुरेशी समाज बांधवांनी संमेलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- रफिक शेठ कुरेशी(कुरेशी वेलफेअर फाउंडेशन)

नितीन फुलझाडे 

चिखली:-कुरेशी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय कुरेशी कॉन्फरन्सच्या वतीने चौथे राष्ट्रीय संमेलन बुलढाणा येथे आयोजित करण्यात आले.हे महत्वपूर्ण संमेलन 4 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी भवन, मलकापूर रोड बुलढाणा येथे पार पडणार आहे. या संमेलनात राज्यभरातील तसेच देशाच्या विविध भागातील कुरेशी समाजातील मान्यवर, समाजसेवक, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.या संमेलनाला कुरेशी कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सनोबर अली कुरेशी (दिल्ली) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाचे आयोजन राष्ट्रीय कुरेशी कॉन्फरन्सचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नगरपरिषद बुलढाणा येथील नगरसेवक माननीय जाकीर हुसेन कुरेशी यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून कुरेशी समाजाला एकत्र आणून समाजाच्या विकासासाठी ठोस दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संमेलनाला बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील कुरेशी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुरेशी वेलफेअर फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा चिखली नगर परिषदेचे शिक्षण सभापती रफिक शेठ कुरेशी यांनी केले आहे.

Previous Post Next Post