Khabarbat News- १२ वी साठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा; टीम वेलफेअरचा स्तुत्य उपक्रम






मेहकर:- येथे वेलफेयर पार्टी शाखा मेहकर यांच्या वतीने MES हायस्कूलजवळ सकाळी 9 वाजता एक सामाजिक व जनहिताचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाची माहिती आधीच बॅनर लावून देण्यात आली होती, त्यामुळे परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये चांगला उत्साह दिसून आला.

     या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश इयत्ता 12 वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणे व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देणे हा होता. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी “All the Best” देत शुभेच्छा देण्यात आल्या व आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचे आवाहन करण्यात आले.

     या वेळी चे वेलफेयर पार्टी शाखा मेहकर  सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये दानिश खान, तोहीद शाह, झैद शेख, सलीम गवाली, शेख जावेद, सोहेल शेख, मुजाहिद खान तसेच पक्षाचे इतर सर्व सदस्य उपस्थित होते. सर्वांनी मिळून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला. स्थानिक नागरिकांनी वेलफेयर पार्टी शाखा मेहकर यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले

Previous Post Next Post