मुंबई : चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा स्वीकार करत आज रायपूर, सैलानी, भडगाव व परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला.
रायपूर सर्कल सैलानी येथील शेख चांद मुजावर (माजी पंचायत समिती सदस्य), शेख असलम मुजावर (ग्रामपंचायत सदस्य), शेख इरफान मुजावर, शेख नई मुजावर, शेख रिजवान, शेख शहजाद मुजावर, शेख फिरोज मुजावर, शेख हुजेब मुजावर व शेख साहेब मुजावर (शेरू) यांनी पक्षप्रवेश केला. भडगाव येथील किशोर संतोषराव साखरे पाटील (माजी पंचायत समिती सदस्य), प्रकाश शांतीराम खडके (ग्रामपंचायत सदस्य) तसेच रायपूर येथील मोहम्मद एजाज मोहम्मद मंजूर, मोहम्मद साबीर मोहम्मद उस्मान (माजी सरपंच), शेख भिकन शेख बबलू, सलीम खान हसन खान, शेख कयूम शेख बुडन व मोहम्मद मुशरथ मोहम्मद एजाज यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
राज्यात व केंद्रात सुरू असलेल्या विकासकामांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास दिसून येत असून त्याचाच परिणाम म्हणून विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये प्रवेश सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिखली मतदारसंघात राबविण्यात येणाऱ्या विकासकामांमुळे स्थानिक स्तरावरही पक्षाची ताकद वाढत असल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले.
यावेळी भाजपा नेते शंकर पाटील तरमळे, पिंपळगावसराईचे सरपंच केशव पाटील तरमळे, माजी पंचायत समिती सदस्य संदीप पाटील उगले, माजी सरपंच गणेश पाटील साखरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील शेवाळे आणि मंगेश तरमळे उपस्थित होते.
