![]() |
सामाजिक कार्याची दखल: दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी श्याम देशमुख यांना मुंबईत 'प्रेरणा पुरस्कार' प्रदान
प्रिंट मीडियावर आजही वाचकांचा विश्वास- यासीन पटेल
नितीन फुलझाडे
चिखली:- सोशल मीडियाकडे आज अनेकांच्या नजरा वळल्या असल्या तरी, आजही प्रिंट मीडियावर जो विश्वास वाचकांचा कायम आहे तो विश्वास सोशल मीडियावर कायम होऊ शकत नाही, कारण प्रिंट मीडियावर ही पूर्णतः शहानिशा केल्याशिवाय कोणतीही बातमी वारंवार तपासणी झाल्यानंतरच ती खात्रीशीर बातमी प्रकाशित होते. हे विशेष असे प्रतिपादन ए जे एफ सी भारतीय पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल यांनी 20 सप्टेंबर रोजी सर्वोदय मंडळ, गांधी बुक सेंटर नाना चौक मुंबई येथे प्रेरणा पुरस्कार महाराष्ट्रातील पत्रकारांना देत असताना आपले विचार प्रकट केले.
समाजासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करणारा "प्रेरणा पुरस्कार सोहळा" ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या वतीने मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यात दैनिक देशोन्नती, धोत्रा भनगोजी प्रतिनिधी श्याम आसाराम देशमुख यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
20 ऑगस्ट 2026 रोजी मुंबईतील सर्वोदय मंडळ, गांधी बुक सेंटर, नाना चौक येथे हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रतिमा जोशी होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून राजेश नाईक दै. पुढारी, मा विनोद राऊत दै. सकाळ, मा. गणेश कोळी वरिष्ठ पत्रकार, युयुस्तु आरते सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे हे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे निमंत्रक अतुल होनकळसे केंद्रीय सचिव, ॲड. विठ्ठल मोघे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र, गोविंदसिंह राजपूत, यासीन पटेल केंद्रीय अध्यक्ष हे होते.
चिखली तालुक्यातील पत्रकाराला मुंबईत राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.श्याम देशमुख यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या भावी वाटचालीसाठी हा पुरस्कार प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
