केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव राहणार उपस्थित
नितीन फुलझाडे
चिखली:- नगर परिषदेच्या भाजप-शिवसेना महायुतीच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सौ. वैशालीताई कपिल खेडेकर यांच्या उपनगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्याचे आयोजन आज शनिवार, दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता चिखली नगर परिषदेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आयुष मंत्री मा. ना. प्रतापराव जाधव साहेब हे राहणार असून, चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मा. सौ. श्वेताताई महाले पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच या सोहळ्यास नगराध्यक्ष मा. पंडितराव देशमुख, मुख्याधिकारी मा. प्रशांत बिडगर, गटनेता मा. श्री. कुणाल गायकवाड, तसेच नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सौ. वैशालीताई खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
तरी भाजप–शिवसेना महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी या पदभार स्वीकार सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख श्री. विलास घोलप व भाजपा शहर प्रमुख तथा नगरसेवक श्री. सागर पुरोहित यांनी केले आहे.
