नितीन फुलझाडे
भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या सार्धशती जयंती वर्षावर्षा निमित्त विदर्भ प्रांतात
1)मातृतीर्थ सिंदखेडराजा (बुलढाणा)
2)कचारगड (गोंदिया)
3) मेळघाट (धारणी)
अशा 3 जनजाती गौरव यात्रा मोठ्या उत्साहाने आज दि 01 जाने 2026 पासून सुरुवात झाली आहे. ही केवळ एक यात्रा नसून, जनजाती समाजाच्या स्वाभिमान, शौर्य, बलिदान आणि संस्कृतीचा गौरव करणारा ऐतिहासिक उपक्रम आहे.
विदर्भातील 11 शासकीय जिल्हे व 63 तालुक्यांतून प्रवास करत ही यात्रा जनजाती चेतना जागवेल, युवकांमध्ये प्रेरणा निर्माण करेल आणि ज्ञान–शील–एकता या मूल्यांना अधिक बळ देईल.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांत यांच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त जनजाती गौरव यात्रेची आज मातृ-तीर्थ सिंदखेड राजा येथून मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. या यात्रेच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रांत सह संघटन मंत्री श्री. मनोजजी साबळे, बुलढाणा जिल्हा संघचालक प्रा. सुभाषजी मोरे, सिंदखेड राजा नगराध्यक्ष श्री. सौरभ तायडे, ॲड. गजानन कोरडे, श्री. अशोकजी मेहेत्रे, विदर्भ प्रांत छात्रा प्रमुख कु. आर्या पाचखेडे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या पवित्र यात्रेच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया आणि एक सशक्त, आत्मनिर्भर व एकसंध भारत घडविण्याचा संकल्प करूया असे आवाहन प्रांत सह संघटन मंत्री श्री. मनोजजी साबळे यांनी केले.
