Khabarbat News- व्हॉइस ऑफ मीडिया चिखली तालुका तर्फे आद्य पत्रकारांना अभिवादन

 



नितीन फुलझाडे 

 चिखली:-मराठी वृत्तपत्र सृष्टीची पायाभरणी करणारे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी रोजी मराठीतील पहिले वृत्तपत्र म्हणून दर्पण साप्ताहिकाला सुरुवात केली होती त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे या हेतूने दरवर्षी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो व्हॉइस ऑफ  मीडिया संलग्नित  चिखली तालुका पत्रकार संघातर्फे स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते

 या अभिवादन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार, पत्रतपस्वी नानासाहेब पळसकर हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य समन्वयक  सुधीर चेके पाटील हे होते.

 याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार महेश वाधवानी यांनी आपल्या भाषणातून आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. 

 आपल्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये होईस ऑफ मीडियाचे राज्य समन्वयक सुधीर चेके पाटील यांनी संघटन ही काळाची गरज असून पत्रकारांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी संघटित होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. पत्रकार दिनाचे औचित्य साधून चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राचार्य निलेश गावंडे यांनी कार्यक्रम स्थळी येऊन पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल जोशी सचिव ओमप्रकाश खत्री यांच्यासह जेष्ठ पत्रकार प्रकाश मेहेत्रे,  मंगेश पळसकर, गोपाल तुपकर, उध्दव थुट्टे पाटील, समाधान गाडेकर, अमोल खेकाळे, पवन शिराळे, पवन लड्ढा, विनोद खरे, प्रफुल्ल देशमुख, बळीराम गुंजाळ

, काशिनाथ शेळके पाटील, शिवदास जाधव, आकाश डोणगांवकर, तनजीम हुसेन, समीर शेख, विजय गोंधणे, रंगनाथ सावळे, विक्रांत महाजन आशिक जमादार आदी पत्रकार उपस्थित होते

Previous Post Next Post