नितीन फुलझाडे
चिखली : नुकत्याच पार पडलेल्या चिखली नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे चिखली शहराच्या राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाली असून त्यांच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन सोमवार, दि. ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता नगरपरिषद, चिखली येथे करण्यात आले आहे. हा सोहळा चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.
या पदग्रहण समारंभास चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रतापसिंह राजपूत, प्रकाश महाराज जवंजाळ, सुरेशआप्पा खबुतरे, अॅड. विजय कोठारी, ज्येष्ठ नेते अंकुशराव पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रेमराज भाला, भाजप चिखली ग्रामीण मंडळ अध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, शहराध्यक्ष सागर पुरोहित, अमडापूर मंडळ अध्यक्ष अमोल साठे, भाजपा नेते अॅड. मंगेश व्यवहारे, सुरेंद्र पांडे, रामदास देव्हडे, सुनील पोफळे, सुनील वायाळ, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे, योगेश राजपूत, डॉ. आशुतोष गुप्ता, शिवराज पाटील, विलास घोलप आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
आ. श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनात पंडितराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चिखली शहराचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि जनहिताच्या योजना प्रभावीपणे राबवल्या जातील, असा विश्वास भाजप कार्यकर्ते व नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
