Khabarbat News- दर्पण दिनानिमित्त तालुका पत्रकार संघातर्फे जीवन गौरव, शोध पत्रकारिता व नवपत्रकारिता पुरस्कारांसह आरोग्य तपासणी शिबिर

 



नितीन फुलझाडे 

चिखली : पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी सलग्नित असलेल्या चिखली तालुका पत्रकार संघा तर्फे पत्रकारितेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी दिले जाणारे जीवन गौरव पुरस्कार, शोध पत्रकारिता पुरस्कार व स्व. गिरीश दुबे नवपत्रकारिता पुरस्कार यंदाही जाहीर करण्यात आले आहेत. दर्पण दिनानिमित्त हा पुरस्कार वितरण सोहळा तसेच पत्रकारांसाठी भव्य आरोग्य तपासणी शिबिर मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील शिदोरीगृह येथे आयोजित करण्यात आला आहे.


       पत्रकारिता पुरस्कारांचे  वितरण


             यंदाचा जीवन गौरव पुरस्कार चिखली येथील ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक ‘चिखली अंजली’चे मुख्य संपादक रमाकांत गयाप्रसाद कपूर यांना जाहीर करण्यात आला आहे. शोध पत्रकारिता पुरस्कार देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथील अनुभवी पत्रकार सुनील सुदाम मतकर यांना, तर स्व. गिरीश दुबे नवपत्रकारिता पुरस्कार २०२५ चिखली येथील युवा पत्रकार सैय्यद साहिल सैय्यद राजू (उर्फ सद्दाम) यांना प्रदान करण्यात येणार आहे. हे सर्व पुरस्कार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे व बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीत राजपूत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत.


   

Previous Post Next Post