Khabarbat News- पंडीतराव देशमुख यांनी चिखली शहराची ओळख सहकार ग्राम म्हणून निर्माण करावी – काकासाहेब कोयटे

 



नितीन फुलझाडे 

चिखली:- सहकार चळवळीत मागील अनेक वर्षांपासून सहकारी असलेले पंडीतराव देशमुख यांच्यावर सर्वसामान्यं जनतेने विश्वास टाकत त्यांची नगराध्यक्ष पदी केलेली निवड ही सहकार क्षेत्रासाठी गौरवास्पदं बाब आहे. पंडीतराव देशमुख यांनी चिखली शहराची ओळख सहकार ग्राम म्हणून निर्माण करावी व त्यासाठी महाराष्ट्र राज्यं पतसंस्था फेडरेशन संपुर्ण ताकदीनिशी पंडीतराव देशमुख यांच्या पाठीशी उभी राहिल असा विश्वास महाराष्ट्रं राज्यं पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष  काकासाहेब कोयटे यांनी व्यक्तं केला. चिखली शहराच्या नगराध्यक्ष पदी पंडीतराव देशमुख हे लोकनियुक्तं नगराध्यक्ष म्हणून निवडुन आल्याबद्दल शहरातील सर्व पतसंस्थांच्या वतीने त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला.

बालाजी अर्बनच्या स्वा. विनायक दामोधर सावरकर सभागृहामध्ये संपन्नं झालेल्या या सत्कार सोहळयाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा अर्बन चे संस्थापक अध्यक्ष राधेशाम चांडक हे होते तर महाराष्ट्रं राज्यं पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष  काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते पंडीतराव देशमुख् यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंचावर महाराष्ट्रं राज्यं पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष शांतीलाल सिंगी , खजीनदार दादाराव तुपकर , तज्ञ संचालक सुदर्शन भालेराव , चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिश गुप्तं, जवाहर अर्बन पतसंस्थेचे अध्यक्षं रमेश बाहेती , इंदिरा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष पप्पुसेठ हरलालका , माजी नगराध्यक्ष जसवंत श्रीवास्तव,  बालाजी अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड मंगेश व्यवहारे , अंबिका अर्बनचे जेष्ठं संचालक सुरेंद्रप्रसाद पांडे , अंकुशराव पडघान आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहरातील पतसंस्थांच्या वतीने पंडीतराव देशमुख यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनीदेखील पंडीतराव देशमुख यांचा सत्कार केला.

पुढे बोलतांना काकासाहेब कोयटे यांनी सहकारी पतसंस्थांना येणाऱ्या अडचणी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणललो की , शासनाकडे अनेकवेळा मागणी करुन विनंतीअर्ज करुन आपल्या मागण्या मान्य करीत नसल्यामुळे शासनाला आता न्यायालयाच दणका दिल्याशिवाय शासन वठणीवर येणार नाही त्याचबरोबर जनआंदोलन देखील उभारावे लागणार आहे. त्याचबरोबर पतसंस्थांच्या संचित तोटयासाठी शासन संचालक मंडळाला जबाबदार धरत असेल तर नफयातदेखील भागीदारी दयायला पाहिजे. त्याचबरोबर सरफेशी कायदा पतसंस्थांना लागू करण्याची मागणीदेखील त्यांनी आपल्या भाषणात केली. 


*सहकार हे इश्वराचेच दुरसे रुप आहे – राधेशाम चांडक*

सहकार हे इश्वराचेच दुसरे रुप असून ज्याप्रमाणे इश्वराला काहीही अशक्यं नाही त्याचप्रमाणे सहकारी पतसंस्थांना देखील काहीच अशक्य नाही. असे प्रतिपादन बुलडाणा अर्बन चे अध्यक्ष राधेशाम चांडक यांनी अध्यक्षपदावरुन बोलतांना केले. तसेच पतसंस्था व नगरपालीका या वेगवगेळया ठेवून कार्य करण्याचा वडीलकीचा सल्ला देखील त्यांनी पंडीतराव देशमुख यांना दिला. तसेच नगराध्यक्ष पदावर कार्य करीत असतांना वेळप्रसंगी कठोर होऊन कार्य करावे लागेल असे सांगून पंडीतराव देशमुख यांनी जनतेच्या मनातील नगराध्यक्ष म्हणून कार्य करावे असे आवाहनदेखील त्यांनी केले. याप्रसंगी फेडरेशनचे उपाध्यक्ष शांतीलालजी सिंगी यांनीदेखील आपले मनोगत व्यक्तं केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविकमध्ये पतसंस्था फेडरेशनचे तज्ञ संचालक सुदर्शन भालेराव यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भुमिका स्पष्ठं करुन एकता हीच सहकाराची शक्ती हा मुलमंत्र ऊन कार्य करीत राहण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. त्याचबरोबर चिखली शहरात सहकार भवन मंजुर करण्याची मागणीदेखील त्यांनीयाप्रसंगी नगराध्यक्ष पंडीतराव देशमुख यांचेकडे केली.

स्वच्छं , सुंदर व हरीत चिखली हेच आपले ध्येय – पंडीतराव देशमुख 

सत्काराला उत्तर देतांना पंडीतराव देशमुख यांनी चिखली शहराला स्वच्छं सुंदर व हरीत बनविणे हेच आपले ध्येय असून आपण् बालपणापासूनच चिखली शहराचा नगराध्यक्ष बनण्याचे पाहिलेले स्वप्नं जनतेच्या साथीने पुर्ण झाले असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबध्दं असल्याचे स्पष्टं केले. 

कार्यक्रमाला शहरातील विविध् पतसंस्थाचे पदाधीकारी , कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. आभारप्रदर्शन बालाजी अर्बन पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल गाडे यांनी केले.

Previous Post Next Post