नितीन फुलझाडे
चिखली:- दिनांक 30 सप्टेंबर 2025 ला आदर्श विद्यालय चिखली येथे संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय स्क्वॅश स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या खेळाडूंनी 4 गोल्ड मेडल, 3 सिल्व्हर मेडल व 6 ब्राँझ मेडल अशी एकूण 13 मेडल्स प्राप्त करून विभागस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.खेळाडूंना प्राचार्य श्री.गव्हले सर,उपप्राचार्य श्री.आरसोडे सर,निळे सर यांच्या हस्ते मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेत अनुज लोखंडे,आदित्य भवर,नेत्रा वेंडोले,अनन्या अंभोरे यांनी गोल्ड मेडल,दिव्या भराड,विशाखा इंगळे,तन्वी शेटे यांनी सिल्व्हर मेडल,समर्थ कुलवंत,चैतन्य जोशी,सार्थक शिराळे,वृंदावनी कोल्हे, स्मिता सवडकर,स्वरा महाजन यांनी ब्राँझ मेडल प्राप्त केले. विभागस्तरावर निवड झाल्याबद्दल शि.प्र.मं.चे अध्यक्ष मा.रामकृष्णदादा शेटे,सचिव प्रेमराजजी भाला सर्व संचालक मंडळ पर्यवेक्षक दंडे सर,शेटे सर,तायडे सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.खेळाडूंना क्रीडा शिक्षक संतोष गुळवे व होमराज कोळी यांनी मार्गदर्शन केले.
