नितीन फुलझाडे
देऊळगाव राजा:- जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अंनत श्री विभूषीत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम यांचा हृदय पादूका दर्शन सोहळा, धोंडीराज मठ, जालना रोड, देऊळगांव राजा येथे सकाळी 10:00 वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख श्री कुंडलिकराव वायभासे, व्यवस्थापक श्री सुरेश मोरे, सहव्यवस्थाक श्री ऋषिकेश बिरारी, पीठ प्रसिद्धी प्रमुख अमर इधोळ यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे दिली आहे.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, रक्तदान शिबिर, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान, मोफत रुग्णवाहिका सेवा - महाराष्ट्रात विविध महामार्गावर 53 रुग्णवाहिका 24 तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, मोफत घरघंटी वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, रक्तदान शिबिर या वर्षी जानेवारी मध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून जानेवारी 2026 मध्ये अवघ्या 15 दिवसांमध्ये 1,71, 150 (एक लक्ष एकाहत्तर हजार एकशे पन्नास) रक्त कुपिंकांचे संकलन करण्यात आले, ब्लड इन नीड, "एक पेड माँ के नाम" वृक्षारोपण उपक्रमांतर्गत 1,10,687 वृक्षारोपण नोव्हेंबर 2025 महिन्यांमध्ये करण्यात आले, इत्यादी उपक्रम आयोजित केली जातात.
या कार्यक्रमासाठी पश्चिम विदर्भ पिठ अंतर्गत दक्षिण बुलडाणा जिल्हातील सर्व पदाधिकारी, तालुका समिती, सेवाकेंद्र समिती, आरती समिती, व कार्यकर्ते, भाविक भक्त, साधक, शिष्य, हितचिंतक यांनी देऊळगांव राजा येथील पादूका दर्शन सोहळा दि. 27 जानेवारी 2026 रोजी आयोजित केला आहे, तरी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पादूका दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमात दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी पादूका दर्शन, उपासक दीक्षा, गुरुपूजन कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी उपासक दीक्षा घेण्यासाठी नोंदणी करावी. या पादूका दर्शन सोहळयासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कार्यक्रमात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी या महंन्मंगल समयी आपण सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार, आप्तइष्ट मित्रांसह उपस्थित राहून परमश्रद्धेय रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या पादूका दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पश्चिम विदर्भ पीठ इंजिनियर, श्री दिपक चिंचोले साहेब, पीठ समिती सदस्य, श्री संतोष दसरे सर, जिल्हा निरिक्षक तथा महिला पीठ निरिक्षक सौ. लताताई दिपक चिंचोले, दक्षिण बुलडाणा जिल्हा सेवाध्यक्ष, श्री गणेश खडोळ सर, जिल्हा महिलाध्यक्ष, सौ. आशाताई निंभोरे,
जिल्हा कर्नल, संजय हराळ, जिल्हा सचिव, प्रविण कर्हाळे, जिल्हा युवाध्यक्ष, मंगेश मोठे, जिल्हा संजिवनी प्रमुख, कैलास खांडेभराड, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, रमेश गुजर, देऊळगांव राजा तालुकाध्यक्ष, गणेश बोराटे, देऊळगाव राजा तालुका महिलाध्यक्ष, सुनिताई शि़गणे, यांच्यासह प्रविण श्रीरंगम् संपूर्ण तालुका सेवा समिती, संपूर्ण जिल्हा सेवा समिती, दक्षिण बुलडाणा यांनी केले आहे.
