नितीन फुलझाडे
चिखली:-नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक अमोल सुरेशअप्पा खबुतरे यांची चिखली नगरपरिषद गटनेते पदी निवड करण्यात आली आहे.आ.सौ.श्वेताताई महाले पाटील तसेच नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदरील निवड करण्यात आली.
स्थानिक श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेत 1 जानेवारी रोजी प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चिखली नगरपरिषद गटनेता निवडी संदर्भात भाजपची बैठक पार पडली. बैठकीत सर्वानुमते अमोल सुरेशअप्पा खबुतरे यांची भारतीय जनता पार्टीच्या चिखली नगरपरिषद गटनेतेपदी निवड करण्यात आली.या निवडीमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
चिखली नगरपालिकेच्या भाजपा गटनेतेपदी अमोल सुरेशआप्पा खबुतरे यांची पक्षाने एकमताने निवड केल्यानंतर त्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. यानिमित्त जिल्हाधिकारी मा. डॉ. किरण पाटील यांची बुलढाणा येथील जिल्हाधिकार्यालयात भेट घेतली. याप्रसंगी आमदार मा.चैनसुखजी संचेती यांच्यासह नूतन नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्यासह भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.*
*नगरपरिषद चिखली मध्ये असे आहे संख्याबळ
चिखली नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे पंडितराव देशमुख हे विजयी झाले आहे. तर एकूण 14 प्रभागाचे 28 नगरसेवक ज्यामध्ये भाजपा 13, काँग्रेस 12, शिवसेना 1, राष्ट्रवादी काँग्रेस 1, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 1 अशी सदस्य संख्या आहे**

