नितीन फुलझाडे
चिखली : नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदावर विजयी झालेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व नूतन नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांचा चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने दि. २६ डिसेंबर रोजी सत्कार करण्यात आला. श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या या छोटेखानी सत्कार समारंभात तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे व सचिव महेश गोंधणे यांनी पंडितराव देशमुख यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. उपस्थित पत्रकारांनी देशमुख यांचे विजयाबद्दल अभिनंदन करत आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तालुका पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष छोटू कांबळे तसेच ज्येष्ठ सदस्य संतोष लोखंडे, रेणुकादास मुळे, कैलास शर्मा, रमाकांत कपूर,रवींद्र फोलाने, इफ्तिखार खान, रमिझ राजा व कमलाकर खेडेकर यांची याप्रसंगी उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी लोकशाही सुदृढ राखण्यासाठी पत्रकारांचा मोठा हातभार लागत असल्यामुळे आपल्या कार्यकाळात निश्चितच पत्रकार बांधवांसाठी उल्लेखनीय कार्य करण्याचे आश्वासन यावेळी बोलताना दिले.
