Khabarbat News- जीवनदान महाकुंभ 2026 अंतर्गत चिखलीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

 


 

नितीन फुलझाडे 

चिखली :- "रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान", असल्याने एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, या उदात्त हेतूने जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने दरवर्षी प्रमाणे यंदाही जगद्गुरु रामानंदाचार्य संप्रदाय संस्थान तर्फे रविवार ११ जानेवारी रोजी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चिखली मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या शुभहस्ते तसेच चिखली नगर परिषद नवनिर्वाचित नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रक्तदान शिबिराचे उदघाट्न करण्यात येणार आहे. 

 सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत शिबिरात रक्त संकलित करण्यात येणार असून रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत रक्ताची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. जगातील तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी कृतिम रक्त तयारकरण्याचा शोध अध्यापर्यंत लागलेला नाही. त्यामुळे प्रत्येक सुजाण नागरिकाने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र, अल्पोपहार तसेच आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. रक्ताचा तुटवडा दूर करणे तसेच, अपघातग्रस्त, गर्भवती माता, मायक्रो साईटिक, ॲनिमिया, सिकलसेल, थैलेसिमिया, हिमोफिलिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर, अशा गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांचा जीव वाचवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.



त्यामुळे या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी, व्यापारी वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पश्चिम विदर्भ उपपीठ इंजिनिअर प्रमुख दिपक चिंचोले, जिल्हा निरीक्षक लताताई चिंचोले, जिल्हा अध्यक्ष गणेश खडोळ, जिल्हा महिला अध्यक्ष आशाताई निंभोरे, जिल्हा कर्नल संजय हराळ, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख रमेश गुजर, जिल्हा सचिव प्रविण कऱ्हाळे, जिल्हा अध्यात्मिक प्रमुख सविताताई वाकोडे, तालुकाध्यक्ष आत्माराम राऊत, तालुका सचिव  गायकवाडताई यांनी केले आहे.

Previous Post Next Post