Khabarbat News- सौ. मीना महाजन यांनी आत्महत्या करून संपवले जीवन




*पोलिसांनी कसून तपास केल्यास आत्महत्येचे कारण समोर येणार*

नितीन फुलझाडे 

*चिखली:- सौ. मीना राजेंद्र महाजन वय 40 वर्षे राहणार बैलजोडी चौक यांनी आज 9 जानेवारी रोज शुक्रवारी 1 वाजेच्या सुमारास त्यांचे राहते घरी पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.त्यांचे पती मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करतात. त्यांना दोन मुले असून गेल्या पाच डिसेंबर रोजी मोठ्या थाटामाटात मुलीचे लग्न महाजन कुटुंबाने पार पाडले होते. सौ.महाजन देखील ब्युटी पार्लर, बचत गट असे लघुउद्योग करत होत्या.लग्न होऊन सव्वा महिनाही उलटला नाही तर त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवले आहे. मोबाईल फोनवर बोलत असतानाच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्याचे समजते. मोबाईल फोन त्यांनी ज्या ठिकाणी गळफास घेतला तेथे त्यांच्या पायाजवळ पडलेला होता. तसेच प्रत्यक्षदर्शीच्या मते मोबाईल फोनवर लगातार कॉल सुरू होते. सदरील दुर्दैवी घटना घडलेल्या परिसरात आर्थिक व्यवहारातून ही घटना घडल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. घटनास्थळी चिखली पोलिसांनी पंचनामा करून सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवला होता. महाजन यांच्या मोबाईलवर येणाऱ्या कॉल हिस्ट्रीची व मोबाइलची पोलिसांनी कसून चौकशी केल्यास महाजन यांनी उचललेल्या आत्महत्येच्या टोकाच्या पावलाची खरी कहाणी समोर येईल अशी नागरिकात चर्चा सुरू होती.*

Previous Post Next Post