भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत पिडीतांच्या जगण्याला बळ दिले - राहुलभाऊ बोंद्रे
चिखली: दि. 06 डिसेंबर 2025
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थषास्त्रज्ञ राजकारणी आणी थोर समाजसुधारक होते, भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणुनही त्यांना विष्वभरात ओळखल्या जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील दिन,दलीत, मजुर, स्त्रिया यांच्यावरील सामाजीक भेदभावा विरूध्द आवाज उठवून संघर्ष करीत पिडीतांना न्याय देण्याचे अजरामर कार्य केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संघर्षत्यातुन पिडीत शोषीतांच्या जगण्याला बळ दिल्याचे प्रतिपादन बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी केले. आज चिखली कॉग्रेसच्या वतीने अषोक वाटीकेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. दिनांक 06 डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे षिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वान दिन म्हणुन देषभरात साजरा केला जातो. सन 1956 साली या दिवषी देषाची राजधानी दिल्ली येथील राहत्याघरी डॉ.भिमराव रामजी आंबेडकर याचं निधन झालं. त्यामुळे या दिवसाला महापरिनिर्वान दिन म्हणुन संबोधल्या जाते.
चिखली कॉग्रेस कमिटीच्या वतीने माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या हस्ते स्थानिक जयस्तंभ चौक अषोक वाटीकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. मोहमंद इसरार, माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रे, आसिफ भाई, जक्का भाई, षिवसेनेचे श्रीराम झोरे, आनंद गैची, रवि पेटकर, प्रा. पुरूषोत्तम वायाळ सर, डॉ. अमोल लहाने, डॉ. प्रकाष षिंगणे, मनोज लाहुडकर, विजय गाडेकर, विजय जागृत, साहेबराव डुकरे, गोकुळ षिंगणे, गोपाल देव्हडे, जाकीर भाई, रहिमभाई पठाण, अंबादास खरात, भारत मुलचंदानी, उबेदअली खान, आनंद बोंद्रे, संतोष देषमुख, रवि महाजन, प्रषांत भटकर, समाधान बांडे, संतोष गवारे, गोपाल गायकवाड, रत्नदिप षिनगारे, पप्पु जागृत, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
खबरबात स्पेशल
