नितीन फुलझाडे
चिखली(गोद्रि):- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त गोदरी मंडल येथे सकल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून,याच पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान या परिसरातील सभागृहामध्ये रविवार दि.1 फेब्रुवारी रोजी सकल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे सभागृह मध्ये आयोजित सकल हिंदू संमेलनास सकल हिंदू समाज गोदरी मंडल या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उस्फूर्त प्रतिसाद दिला.प्रमुख प्रवक्ते मा.श्री.अंबादासजी साठे बुलडाणा जिल्हा सहकार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख उपस्थिती ह.म.प.विलासजी महाराज वाघमारे खामगाव,ओमराजे गायकवाड गोरक्षक, रमेशजी भवर, गवारे गोरक्षक हे उपस्थित होते. हे संमेलन पार पाडण्यासाठी सकल हिंदू समाज गोदरी मंडलातील अनेक युवकांनी व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
