Khabarbat News- चिखलीत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७४० वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

 



नितीन फुलझाडे 

चिखली: सोनार समाजाचे आराध्यदैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७४० वी पुण्यतिथी चिखली येथील सोनार समाज मंदिरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांना समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती.

कार्यक्रमाचा प्रारंभ अनिकेत लोळगे व सौ. अनुराधा लोळगे यांच्या हस्ते संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. दीपप्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपस्थित समाज बांधवांनी सामूहिक महाआरती केली. "नरहरी सोनार महाराज की जय" अशा जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. आरतीनंतर उपस्थित भाविकांना अल्पोपहार व प्रसादाचे वाटप करण्यात आले.

"नूतन कार्यकारिणीची निवड'


याच मंगल प्रसंगी चिखली सुवर्णकार समाजाची  नवीन कार्यकारिणी सर्वानुमते घोषित करण्यात आली. यामध्ये समाजाच्या अध्यक्षपदी भिकू लोळगे यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी दीपक काळे यांची नियुक्ती झाली आहे. तर इतर कार्यकारणी याप्रमाणे 

 सचिव  सुनील डहाळे

 कोषाध्यक्ष: संतोष डहाळे

 सहसचिव: समीर दहिवाळ

  सदस्य: दीपक दिघेकर, शिवशंकर डहाळे, रवींद्र मुंडलिक, विशाल टेहेरे, अमित टेहेरे, विजय गाडेकर, रवींद्र कुलथे, शैलेंद्र शहाणे.

नूतन कार्यकारिणीचे सर्व समाज बांधवांकडून अभिनंदन करण्यात आले असून, आगामी काळात समाजाच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी समाजातील नवयुवकांनी विशेष पुढाकार घेतला होता. शिस्तबद्ध नियोजन आणि व्यवस्थापनामुळे हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला. या कार्यक्रमाला सुवर्णकार समाजातील पुरुष, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post