Khabarbat News- देऊळगाव राजात जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचा पादुका दर्शन सोहळा संपन्न..

 


नितीन फुलझाडे 

         देऊळगाव राजा:-  जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अनंत श्री विभूषित जगद्‌गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी, रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणिजधाम यांचा पादुका दर्शन सोहळा व प्रवचन दर्शन सोहळा मंगळवार दिनांक - २७ जानेवारी २०२६ रोजी देऊळगाव राजा शहरातील पदमजी पिस्तमजी जिनिंग मैदान, धोंडीराज महाराज मठाजवळ, जालना रोड, देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा (दक्षिण) येथे उत्साहात संपन्न झाला.

      कार्यक्रमासाठी सिंदखेड राजा मतदार संघांचे लोकप्रिय आमदार श्री मनोजभाऊ कायंदे यांच्या मातोश्री श्रीमती नंदाताई कायंदे, शिपणे ताई नगराध्यक्षा आरोग्य सभापती शिंदे साहेब, शिपणे साहेब

आमदार यांच्या मातोश्री नंदाताई कायंदे, शिपणे ताई नगराध्यक्षा

श्री गणेश मांटे मा.जिल्हा अध्यक्ष भाजपा पश्चिम विदर्भ पिठाचे सहपीठ प्रमुख संजय खंडागळे, पीठ व्यवस्थापक श्री. सुरेश मोरे, पीठ इंजिनीयर श्री. दिपक चिंचोले, पीठ महिला निरीक्षक व दक्षिण बुलढाणा जिल्हा निरीक्षक सौ. लताताई चिंचोले, पीठ प्रसिद्धी प्रमुख अमर इधोळ, पीठ प्रवचनकार प्रमुख राजू सणांसे, पीठ समिती सदस्य श्री. संतोष दसरे सर पीठ सदस्य सुधाकर मेहसरे  यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

     जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुका श्री दशरथ राठोड सर यांच्या निवासस्थानी होत्या. त्यांनी खूप सुंदर व्यवस्था केली होती. या वेळी देऊळगाव राजा शहरातून जगद्‌गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांची सजवलेल्या रथा मधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.त्यानंतर सामाजिक उपक्रम अंतर्गत महिला दुर्बल घटकांना 12 शिलाई मशीनचे वाटप सिंदखेड राजा मतदार संघांचे लोकप्रिय आमदार श्री मनोजभाऊ कायंदे यांच्या मातोश्री श्रीमती नंदाताई कायंदे, शिपणे ताई नगराध्यक्षा आरोग्य सभापती शिंदे साहेब, शिपणे साहेब तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर ज.न.म. प्रवचनकार सौं अल्काताई खर्डे यांचे सुमधुर असे प्रवचन संपन्न झाले. ताईंनी प्रवचन सेवेच्या माध्यमातून उपस्थित सर्व भक्तगणांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर गुरु पूजन, उपासक दीक्षा, जगद्‌गुरुश्रींचे अमृततुल्य ऑनलाईन प्रवचन, सिद्ध पादुका दर्शन सोहळा, पुष्पवृष्टी, सांगता आरती असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. याच कार्यक्रमात ४८८ भक्तगणांनी उपासक दीक्षा घेतली. कार्यक्रमास 7000 ते 8000 हजार भाविकांची उपस्थिती होती. दिवसभर येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष दसरे यांनी केले.  हा नयनरम्य सोहळा यशस्वी करण्यासाठी पीठ इ़ंजिनियर, श्री दिपक चिंचोले साहेब, पीठसमिति सदस्य श्री संतोष दसरे सर, पीठ महिला निरिक्षक, सौ. लताताई दिपक चिंचोले दक्षिण बुलडाणा जिल्हा सेवाध्यक्ष, श्री गणेश खडोळ सर, जिल्हा महिलाध्यक्ष, सौ. आशाताई निभोंरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, रमेश गुजर,जिल्हा कर्नल, संजय हराळ, जिल्हा सचिव, प्रविण कर्हाळे, जिल्हा युवाध्यक्ष, मंगेश मोठे, जिल्हा संजिवनी प्रमुख, कैलास खांडेभराड,  देऊळगांव राजा तालुकाध्यक्ष, गणेश बोराटे,तालुका महिलाध्यक्ष, सुनिताई शि़गणे,गणेश तिडके,रंजनताई वाघमारे, राजु भावसार,डेबु महाराज,पेशवे ताई, प्रविण श्रीरंगम, पोकळेताई ब्रिगेडीअर विकास, कांता टेम्भूरकर या़च्यासह जिल्हा सेवा समिती, तालुका सेवा समिती, सेवा केंद्र समिती, आरती केंद्र समितीचे पदाधिकारी, युवासेना, हिंदू संग्राम सेना, महिला सेना, प्रवचनकार, गुरु सेवक, प्रोटोकॉल अधिकारी, आजी व माजी पदाधिकारी जिल्ह्यांतील भक्तगण गुरुबंधू व गुरु भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले....

Previous Post Next Post