नितीन फुलझाडे
चिखली:- शहरात बेकायदेशीररित्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. नायलॉन मांजामुळे नागरिक, दुचाकीस्वार तसेच पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने ही कारवाई करण्यात आली.
सविस्तर असे की 13 डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन चिखली ठाणेदार भुषण गावंडे यांनी गुन्हे प्रगटीकरण विभागातील अंमलदार यांना चिखली शहरात मानवी जिवनासह पक्षी व प्राण्यांसाठी धोकादायक ठरणारा नायलॉन मांजा हा मकरसंक्रांती सण जवळ येत असल्याने पतंग उडविण्यासाठी अवैधरित्या विक्री करीता बाजारात विक्रीकरीता उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, अवैध मांजा विक्री करणारे इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणेबाबत आदेशीत केल्याने डी.बी पथकातील अंमलदार चिखली शहरात अवैध नायलॉन मांजा विक्री करणारे इसमांचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, मानवी जिवीतास तसेच पशु पक्षीचे जिवीतास धोकादायक असलेला नायलॉन मांजाचे रिलची एक इसम विक्री करीत आहे अशी माहिती मिळाल्याने सदरची माहिती मा पो नि सा यांना देवुन नायलॉन मांजा विक्री करणा-या इसमावर पो. स्टॉपच्या मदतीने छापा टाकुन नायलॉन मांजा जवळ बाळगणारे इसमास जागीच पकडले. पकडलेल्या इसमास त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख जहुर शेख गफुर वय 49 वर्षे रा. वार्ड क्र 10 अंगुरचा मळा चिखली ता चिखली जिल्हा बुलढाणा असे सांगितले. त्यांचे जवळील कापडी पिशवीची पाहणी केली असता सदर कापडी पिशवी मध्ये 03 लाल रंगाचे नायलॉन मांजा (सिंथेटीक धागा) प्लॉस्टिक रिल मध्ये गुंडाळलेला प्रत्येकी रिल नायलॉन मांजासह किंमत 250/-रू असा एकुण 750/-रूपये किंमतीचा मुददेमाल मिळुन आल्याने तसेच नायलॉन मांजा (सिथेटीक धाग्यावर) शासनाची बंदी असतांना सुध्दा नायलॉन मांजाची विक्री करीत असतांना मिळुन आल्याने त्याचेविरुध्द पोलीस स्टेशन चिखली येथे कलम 125,223 भारतीय न्यांय संहीता सह कलम 5,15 पर्यावरण संरक्षण अधिनियीम 1986 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा पोलीस अधिक्षक निलेश तांबे बुलडाणा, अपर पोलीस अधिक्षक अमोल गायकवाड बुलडाणा, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. भुषण गांवडे यांचे नेतृत्वात डि.बी. पथकाचे सफौ राजेंद्र काळे, मपोहेकॉ ललीता खरात, पोना अमोल गवई, पोकों प्रशांत धंदर, पोकों अजय इटावा, पोकों पंढरीनाथ मिसाळ पोलीस स्टेशन चिखली यांनी केली आहे.
सर्व नागरीकांना चिखली पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करण्यात येते की, पतंग उडविण्यासाठी कोणीही नायलॉन मांजाची विक्री अथवा वापर करु नये अन्यथा विक्री करणा-या तसेच वापर करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
