नितीन फुलझाडे
चिखली:- आदर्श विद्यालयात सहा डिसेंबर 2025 रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहून विनम्र अभिवादन करण्यात आले. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय श्री सतीशजी गवले सर, उपप्राचार्य श्री सन्माननीय आरसोडे सर, श्री पर्यवेक्षक दंडे सर, श्री शेटे सर, श्री. तायडे सर व्यासपीठावर उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्री गवले सर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावरील विद्यार्थ्यांना माहिती सांगितली बाबासाहेबांचे विचार हे सर्व समावेशक आहे. त्यांनी सांगितलेले समता, बंधुता, प्रेम, तसेच स्त्री पुरुष समानता याविषयीची माहिती सांगितली. त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या विचाराचे आचरण विद्यार्थ्यांनी करावे अशा प्रकारचं मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गवले सर यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे श्री ठाकरे सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांनी मोलाचं सहकार्य केलं तसेच विद्यालयाचे शिक्षक श्री राहुलजी पवार यांनीही मोलाचे सहकार्य केलं व सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केलं.b तसेच सर्व कर्मचारी वृंद यांनीही मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री संजयजी ठाकरे सर यांनी केले.
Tags
खबरबात स्पेशल
