Khabatbat- भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख यांच्यासह सर्व नगरसेवकांना विजयी करा.... ऍड.विजयकुमार कोठारी



नितीन फुलझाडे 

चिखली:- आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदानंद नगर येथील हनुमान मंदिरा पासून प्रचार मोहिमेस प्रभाग पाच येथून ॲड.विजयकुमार कोठारी यांच्या शुभहस्ते प्रारंभ करण्यात आला. यानंतर मदनी शहा वली दर्गा येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडित दादा देशमुख तथा प्रभाग 5 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी चादर चढवून आशीर्वाद घेतला. 

         चिखली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडित दादा देशमुख आणि स्थानिक नगरसेवक उमेदवारांच्या समर्थनार्थ ही भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती. केंद्रात,राज्यात आणि चिखली मतदारसंघात देखील भाजपाची सत्ता असल्याने चिखली शहराचा विकास वेगाने होत आहे. चिखली नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदही भाजपालाच द्या, विकास करण्यासाठी हीच योग्य संधी आहे,”अशे उद्गार आमदार श्वेता महाले यांनी यावेळी काढले. भूतो ना भविष्य असा विकास मतदारसंघासह चिखली शहर अनुभवत आहे, असेही त्या म्हणाल्या.पुढे बोलताना त्यांनी पंडित दादा देशमुख यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करताना सांगितले की, "जनतेला आपला, हक्काचा, सहज उपलब्ध होणारा असा माणूस म्हणजे पंडित दादा, त्यामुळे चिखलीतील जनता त्यांना मनापासून साथ देईल याबद्दल मला पूर्ण खात्री आहे.” अशी प्रतिक्रिया आमदार महाले यांनी यावेळी व्यक्त केली.

      "प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रचाराचे नारळ फोडताना ऍड.विजयकुमार कोठारी म्हणाले, भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करा","आम्ही एकमेकांना पुढे नेतो, अडथळे नाही, तर मार्ग तयार करतो.” असे म्हणत त्यांनी  आपला ठाम पाठिंबा पंडितराव देशमुख यांना असल्याचे बोलून दाखवले.

या रॅली दरम्यान नागरिकांमध्ये नवचैतन्य तसेच विकासाला साथ देण्याची तळमळ दिसून आली. पंडितराव देशमुख यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा नगराध्यक्ष आपल्याला मिळणार अशी चर्चा प्रभाग क्रमांक 5 च्या नागरिकांमध्ये सुरू होती. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सह नगरसेवक पदांच्या उमेदवारांना देखील भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन देखील यावेळी ऍड.विजय कोठारी यांनी जनतेला केले.


Previous Post Next Post