नितीन फुलझाडे
नगर परिषद बुलढाणा तर्फे आयोजित कलापथक च्या माध्यमातून वासुदेवाचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन..
बुलडाणा:-
दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी होऊ घातलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूका मध्ये नगर परिषद बुलढाणा अंतर्गत शहरातील नागरिकांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी शरद पाटील , निवडणूक निर्णय अधिकारी व डॉ. जयश्री काटकर-बोराडे , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात शहरा मध्ये कलापथक च्या माध्यमातून नागरिकांचे मतदान करण्याचे प्रमाण वाढावे यासाठी बाजाराच्या ठिकाणी, कारंजा चौक, जयस्थंभ चौक, बस स्थानकात तसेच गर्दीच्या ठिकानी कलापथका च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.या मध्ये कलापथक च्या माध्यमातून लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करावे, मतदान तुमचा हक्कच नाही तर जवाबदारी सुद्धा आहे .
या नगर परिषद बुलढाणा च्या निवडणुकी मध्ये मतदारांनी कुठल्याही आमिषांना बळी पडणार नाही याची दक्षता घेवून स्वत: एक मत स्वत:च्या भविष्या साठी करण्याबाबत वासुदेव श्री. शाहीर गणेश कदम व संच यांनी उपस्थितांना मतदान करण्याबाबत त्यांच्या कलापथक च्या चमू मार्फत आवाहन केले. कलापथक च्या जनजागृती च्या कार्यक्रमास नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
नागरिकांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी, लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन शरद पाटील , निवडणूक निर्णय अधिकारी व डॉ. जयश्री काटकर-बोराडे , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.
